Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra esakal
नाशिक

Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी दौऱ्यासाठी 30 ठिकाणी 116 बॅरिकेटिंग पॉइंट

Nashik Rahul Gandhi : कॉंग्रेस नेते राहुल गांधी दौऱ्यासाठी भद्रकाली पोलिसांकडून ३० ठिकाणी ११६ बॅरिकेटिंग पॉइंट उभारण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दौरा मार्गाची पाहणी करत प्रात्यक्षिक करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी दौऱ्यासाठी भद्रकाली पोलिसांकडून ३० ठिकाणी ११६ बॅरिकेटिंग पॉइंट उभारण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दौरा मार्गाची पाहणी करत प्रात्यक्षिक करण्यात आले. मुंबई नाका आणि सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीतीलही काही रस्त्यांना बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी गुरुवारी (ता.१४) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. (Nashik Bharat Jodo Nyay Yatra barricading points for Rahul Gandhi marathi news)

दुपारी २ वाजता द्वारका भागात त्यांचे आगमन होणार आहे. द्वारका, सारडा सर्कल, खडकाळी सिग्नल, शालिमार ते शिवाजी रोडपर्यंत रोड शो होणार आहे. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. भद्रकाली पोलिसांकडून त्याचे नियोजन केले आहे. यात्रेत होणारी गर्दी लक्षात घेता भद्रकाली, मुंबई नाका आणि सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीत येणाऱ्या एकूण ३० मार्गांवर ११६ ठिकाणी बॅरिकेटिंग पॉइंट उभारले आहे.

संपूर्ण भाग वाहतुकीसाठी बंद केला आहे. सारडा सर्कल येथून यात्रा फाळके रोड, फुले मार्केट, दूध बाजार, खडकाळी भागातून काढण्यात येणार होती. दरम्यान बडी दर्गा येथे दर्शनाचेही नियोजन प्रशासकीय कारणास्तव आणि रमजान पर्व सुरू असल्याने या मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेता यात्रेतून हा भाग वगळला आहे. त्यामुळे द्वारका येथून सारडा सर्कल, शालिमार आणि शिवाजी रोड अशी थेट यात्रा होणार आहे. (latest marathi news)

असे आहेत बॅरिकेटिंग पॉइंट

बॅरिकेटिंग पॉइंट बॅरिकेटिंग संख्या

द्वारका सर्कल चौक.............०५

कावेरी हॉटेल शेजारी.............०१

कावेरी होतील समोरील दुभाजक......०३

रेणुका नगर...................०१

बेल मास्तर चौक................०३

मोठा राजवाडाकडे जाणारा रस्ता......०२

आधार हॉस्पिटल................०३

इगतपुरी चाळ..................०१

साक्षी टी पॉइंट.................०३

सारडा सर्कल चौक...............१५

श्रीकृष्ण बेकरी..................०२

आनंद फोम....................०२

रोटरी हॉलकडे जाणारा मार्ग..........०२

पंचशील नगरकडे जाणारा मार्ग.........०२

गंजमाळ पोलिस चौकी..............०२

अमर पेपर.....................०२

मास्टर मॉलकडे जाणारा मार्ग.........०२

हिरा कुशन.....................०२

खडकाळी सिग्नल.................१२

शिवसेना भवन...................०२

शालिमार चौक...................१०

दीपसन्स कॉर्नर...................०३

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा शेजारी....०४

सीबीएस सिग्नल...................१०

कान्हेरे वाडीकडून येणारा रस्ता..........०२

त्र्यंबक नाका सिग्नल................१०

अण्णाभाऊ साठे चौक...............१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

अतिक अहमदच्या धाकट्या लेकासह दोघांचा अपघातात मृत्यू, तुरुंगातल्या भावाला भेटून परतताना दुर्घटना

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी उचलले ७४.७५ लाख; वसुलीला सुरुवात

रवि किशन यांना लेकीनेच केलं ट्रोल; रिव्हाचा भन्नाट Reel पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, Viral Video

Marathi News Live Updates : जातपडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करते, त्यात सरकारचा हस्तक्षेप नाही; जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

SCROLL FOR NEXT