The ongoing rush of youths to capture the photograph of Congress leader MP Rahul Gandhi in the mobile phone at the meeting held at Shalimar Chowk on Thursday during Bharat Jodo Nyaya Yatra. esakal
नाशिक

Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींसाठी नाशिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Nashik Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. १४) दुपारी नाशिकला आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. १४) दुपारी नाशिकला आले. द्वारका सर्कल ते शालिमार मार्गे त्र्यंबक नाक्यापर्यंत असलेला रोड शो कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये पार पडला. या रोड शोमध्ये खासदार राहुल गांधी यांच्या वाहनाभोवती शहर पोलिसांचे साध्या वेशातील सुरक्षाकडे निर्माण केले होते. (Nashik Bharat Jodo Nyay Yatra Tight security by Nashik Police marathi news)

खासदार राहुल गांधी हे दुपारी तीन वाजेच्या सुमारास द्वारका सर्कल येथे पोचले. त्यानंतर त्यांची रोड-शो झाला. शालिमार चौकात खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले. यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षकांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.

रस्त्याच्या दुतर्फा पोलिस तैनात होते. तसेच उंच इमारतीवरूनही पोलिस रोड-शोवर करडी नजर ठेवून होते. या गर्दीतूनही खासदार राहुल गांधी हे रस्त्यालगतच्या नागरिकांशी संवाद साधला. शालिमार चौक सभेतही राहुल गांधी यांनी उपस्थितांशी थेट संवाद साधत त्यांची मन जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते सीबीएस, त्र्यंबकरोड मार्गे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना झाले.  ( latest marathi news )

मोबाईलमध्ये टिपली छबी

खासदार राहुल गांधी यांच्या रोड शोदरम्यान ठिकठिकाणी रस्त्यालगत नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये राहुल गांधी यांची छबी टिपण्याचा प्रयत्न करीत होते. शालिमार चौकात गांधी यांचे भाषण सुरू असताना त्याचेही चित्रण मोबाईल केले जात होते.

पोलिस साध्या वेशात

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी यांच्या खुल्या वाहनांभोवती शहर पोलिसांनी साध्या वेशात सुरक्षा कडे केले होते. त्यामुळे त्यांच्या वाहनापर्यंत कोणालाही सहजासहजी पोचता येत नव्हते. यामुळे अनेकांना राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा असूनही भेटता आले नाही. या दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी समज दिली. तर, उंच इमारतींवरूनही पोलिसांनी रोड शोवर करडी नजर ठेवून होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT