Saurabh Rajendra Jadhav esakal
नाशिक

Nashik Accident News : ओझरला पीकअप दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

Accident News : सर्व्हिस रोडवर पिकअप गाडी व दुचाकी यांचा अपघात होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

सकाळ वृत्तसेवा

ओझर : येथील गडाख कॉर्नर जवळ महामार्गाला संमातर असलेल्या सर्व्हिस रोडवर पिकअप गाडी व दुचाकी यांचा अपघात होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. (Bike rider death in pick up bike accident Ozar )

काल रात्री साडे आठ ते पाऊणे नऊ वाजेच्या सुमारास अर्जुन विधाते रा. ओझर व सौरभ राजेंद्र जाधव वय, २६ रा. भगतसिंग नगर, ओझर हे दुचाकीनवरुन सर्व्हिस रोडने गडाख काँर्नर जवळून जात असताना त्याच सुमारास भाजीपाला घेऊन पिंपळगाव कडुन सर्व्हिस रोडने नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू पीकअप (एम एच १५ जेसी ६६२०) ने गडाख कॉर्नर जवळ पिकअपच्या बाजुने जाणाऱ्या दुचाकीला गाडीचे ड्रायव्हर बाजुच्या समोरून कट बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक अर्जुन विधाते हा रोडच्या बाजुला पडुन किरकोळ जखमी झाला.

सौरभ राजेंद्र जाधव याचा खांदा, छाती व, हातावरून पिकअप गाडीचे चाक गेल्याने त्यात तो गंभीर जखमी होवुन त्याचा जागीच म्रुत्यु झाला. अपघातानंतर अपघाताची खबर न देता पिकअप सह चालक पळुन गेला. याबाबत ओझर पोलिसांनी पिकअप गाडी चालका विरूद्ध गुन्हा आज उशिरा दाखल केला असुन अधिक तपास एपीआय तुषार गरुड यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार बी जे आहेर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lavani At NCP Office: राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात लावणीचा ठेका! नवा राजकीय वाद पेटला, पाहा व्हायरल व्हिडिओ

आर बाप! भिकारी महिलेकडे सापडले पैशाचे अनेक बंडल, पोत्यात सापडल्या नोटाच नोटा, पैसे मोजायला लागला दिवस

Amit Shah statement : ''महाराष्ट्रात भाजप कोणत्याही कुबड्यांच्या आधारावर नाही'' ; अमित शहांचं वक्तव्य अन् राजकीय चर्चांना उधाण!

तूप, दारू आणि गॅसचा स्फोट... UPSCची तयारी करणाऱ्या तरुणाची लिव्ह इन पार्टनरनं केली हत्या, एक्स बॉयफ्रेंडची घेतली मदत

"मी निगेटिव्ह कमेंट्सला उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही" ट्रोलिंगवर स्पृहाने मांडलं स्पष्ट मत

SCROLL FOR NEXT