MLA Jiva Pandu (JP) Gavit esakal
नाशिक

Nashik News : कोट्यधीश माजी आमदार गावितांच्या संपत्तीत अल्पशी वाढ; 5 वर्षांत अवघ्या 13 लाखांची भर

Nashik : आदिवासींना वनजमिनी मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठ दिवस ठिय्या मांडलेल्या ‘लाल वादळा’चे माजी आमदार जिवा पांडू (जे. पी.) गावित यांच्याकडे दोन कोटी ३६ लाखांची संपत्ती आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आदिवासींना वनजमिनी मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठ दिवस ठिय्या मांडलेल्या ‘लाल वादळा’चे माजी आमदार जिवा पांडू (जे. पी.) गावित यांच्याकडे दोन कोटी ३६ लाखांची संपत्ती आहे. गेल्या पाच वर्षांत या संपत्तीत अल्पशी म्हणजेच १३ लाख १२ हजारांची वाढ झाली असून, विविध ठिकाणी त्यांच्या नावावर जमिनी आहेत. अनुसूचित जमातींसाठी राखीव दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माजी आमदार गावित यांनी शुक्रवारी (ता. २६) अर्ज सादर केला. ( Billionaire ex MLA Gravit wealth has increased slightly )

अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे विवरण त्यांनी सादर केले आहे. त्यांच्याकडे तब्बल सहा गावांमध्ये ४७ एकर २५ गुंठे जमीन आहे. यातील काही जमिनी त्यांनी वेळोवेळी खरेदी केल्या आहेत. या सर्व जमिनींचे खरेदीचे बाजारमूल्य २६ लाख १३ हजार रुपये आहे. विविध मालमत्ता आणि उत्पन्नाच्या आधारे त्यांची एकूण चल संपत्ती दोन कोटी ३६ लाख ४० हजार ८०१ रुपये आहे. २०१९ मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती दोन कोटी २२ लाख २८ हजार ८९२ इतकी होती.

गावितांकडे एक कोटी सात लाखांची अचल संपत्ती आहे. यात सुरगाणा येथे साडेआठ हजार चौरस मीटरचा निवासी भूखंड आहे. अलंगुण (सुरगाणा), पंचवटी (नाशिक) आणि अंधेरी (मुंबई) येथे त्यांचे घर आहे. गावित यांच्याकडे एक लाख दहा हजार रुपयांचे सोने व अन्य दागिने आहेत. त्यांच्याकडे पाच लाख रुपये रोख स्वरूपात आहेत. एक इनोव्हा कार आणि स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर त्यांच्या नावावर आहे. (Nashik Political News)

विविध पोलिस ठाण्यांत सात गुन्हे त्यांच्याविरोधात नोंदविण्यात आले असून, विविध प्रकारची १३ प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यांच्याच पक्षाचे दुसरे उमेदवार सुभाष चौधरी यांच्याकडे ६५ लाख ६४ हजारांची चल संपत्ती आहे. २६ लाखांची अचल संपत्ती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात सादर केले आहे.

‘बाबाजी’ ३८ कोटींचे धनी; ७५ हजारांचे कर्ज

नाशिक लोकसभेत पहिला उमेदवारी अर्ज सादर करणारे शांतिगिरी मौनगिरी महाराज यांच्या नावे ३८ कोटी ८७ लाख ४२ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत विविध ठिकाणी त्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. प्रतिज्ञापत्रात या सर्व जमिनींच्या बाजारमूल्यानुसार किंमत त्यांनी नमूद केली आहे.

चल संपत्ती अर्थात जंगम मालमत्ता एकूण ७१ लाख ६८ हजार ६६४ रुपयांची आहे. ‘बाबाजीं’कडे ५० हजार रुपये रोख, तर १२ विविध बँकांमध्ये ठेवी त्यांनी ठेवल्या आहेत. एलआयसी पॉलिसीसह सात गाड्याही त्यांच्या नावावर दिसतात. विशेष म्हणजे सवंदगाव (ता. वैजापूर) येथील विविध कार्यकारी सोसायटीकडून त्यांनी ७५ हजारांचे पीककर्जही घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT