भाजप  sakal
नाशिक

नाशिक : भाजपचा फटाका, आयुक्त ठरवणार फुसका!

भाजपकडून अनियमित पदोन्नत्तीची खेळी; आयुक्तांना नाकारण्याचा अधिकार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या आठ वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या कर्मचारी व तांत्रिक संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या रूपाने दिवाळी भेट दिली. मात्र, प्रशासनाने विविध कारणांमुळे चौकशी लागलेल्या, तसेच यापूर्वी अधिक एक पदोन्नती घेतलेल्या अधिकाऱ्यांना नाकारलेली पदोन्नती सत्ताधारी भाजपने मागच्या दाराने उपसूचनेचा आधार घेऊन देत अनियमिततेचा बार उडविला. आता प्रशासनाच्या हाती पदोन्नतीचा चेंडू आहे. नियमात पदोन्नती मिळते की मागच्या दाराने आलेल्या ठरावाची जशाच्या तसे अंमलबजावणी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नसल्याने सर्वोच्च व उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने न्याय देताना हक्क डावलता येणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात सरकारी सेवेत पदोन्नतीचा बार उडाला. महापालिकेत मात्र पदोन्नतीची प्रतिक्षा होती. २०१३ मध्ये पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर पदोन्नतीच्या प्रतिक्षेत अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले.

पदोन्नतीअभावी पदे भरली जात नसल्याने परसेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती होत होती. त्यानुसार स्थानिक विरुद्ध परसेवेतील अधिकारी असा नवा वाद निर्माण झाला. महासभेत अनेकदा पदोन्नतीची मागणी करण्यात आली. त्यानुसार प्रशासनाकडून शासन निर्णयाचा संदर्भ देत पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले गेले. दिवाळीपूर्वी ‘क’ व ‘ड’ संवर्गातील ४९३ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची भेट आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

अधिक्षक अभियंता पदाचा कार्यभार असलेले उदय धर्माधिकारी व कार्यकारी अभियंता सुनील रौंदळ यांच्यावर सौभाग्यनगर येथील महापालिकेची कमान कोसळल्याने चौकशी सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांच्यावर लाचलुचपत विभागासंदर्भात चौकशी सुरू असल्याने तिघांनाही समितीने पदोन्नती नाकारली आहे. परंतु, मेरिट व नैसर्गिक न्यायाला धरून नसल्याने तिघांनाही पदोन्नती दिली.

यांत्रिकी विभागाचे उपअभियंता बाजीराव माळी प्रतिक्षा यादीत असताना शासन मान्यतेच्या अधीन राहून कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती दिली. नाशिक रोड विभागातील बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी एक अतिरिक्त पदोन्नती घेतली असतानाही त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा निर्णय घेतला. विद्युत विभागाचे उपअभियंता अनिल गायकवाड प्रतिक्षा यादीत असताना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती दिली. स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार शासनाकडे प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याचे निमित्त करून कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे यांना

पदोन्नती दिली.

फायरमनचे झाले लघुलेखक

२०१७ पासून अग्निशमन अधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळणारे संजय बैरागी यांना मुख्य अग्निशमन अधिकारी पदाची शैक्षणिक अर्हता धारण करत असल्याने पदोन्नती देण्यात आली. अग्निशमन विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असताना फायरमन असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना लघुलेखक पदावर पदोन्नती देण्यात आली. महापालिकेत चार उपायुक्त पदे रिक्त असून, यातील दोन महापालिका संवर्गातून तर दोन शासन सेवेतून नियुक्त करता येतात. त्यामुळे नितीन नेर यांना उपायुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली. अर्थात महासभेने पदोन्नती दिली असली तरी पदोन्नतीची नियमानुसार प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याने आयुक्त काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

संवर्गानुसार पदोन्नतीप्राप्त पदांची संख्या

गट-अ- १६

गट-ब- २१

एकूण- ३७

गट-क व ड

गट-क- ३६१

गट-ड- १३२

एकूण- ४९३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT