Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: लाखाची लाच घेणारा ग्रामसेवक ACBच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : वाढोली ( ता त्रंबकेश्वर) येथील विविध विकासकामांच्या बिलापोटी 1 लाख 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी त्रंबकरोडवरील पंचायत समिती आवारात केली. (Nashik Bribe Crime vadholi gramsevak who took bribe of lakhs arrested by ACB)

अनिलकुमार मनोहर सुपे, (46) असे लाचखोर वाढोलीच्या ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी वाढोली (ता त्र्यंबक) ग्रामपंचायत अंतर्गतचे निलंबिका मजूर व बांधकाम सहकारी सोसायटी मर्यदित (मु.पो.आंबोली ता.त्र्यंबक, जिल्हा- नाशिक)चे नावे वाढोली गावचे विविध कामे घेतलेली होती.

सदर कामे तक्रारदारने विहित कालावधीमध्ये पुर्ण केलेली असून काही कामाची बिले तक्रारदार यास मिळाली. मात्र 2 लाख 99 हजार 776 रुपये या रकमेचे बिल हे वाढोली ग्रामपंचायतीकडून मिळाले नाही.

त्याबाबत तक्रारदारने ग्रामसेवक सुपे यांच्याकडे बिलबाबत विचारणा केली. सदर बिल मंजुर करण्यासाठी 30 हजार रुपये व यापुर्वी तक्रारदार यांनी केलेले कामाचे बिल यापूर्वी मंजूर केलेले आहे.

त्याचे बक्षीस म्हणुन 70 हजार रुपये, सर्व बिलांचे ऑडिट करण्याचे 4 हजार रुपये असे एकूण 1 लाख 4 हजार रुपयांची ग्रामसेवक सुपे यांनी तक्रारदारकडे बुधवारी (ता 29) मागणी केली.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता पथकाने याबाबत पडताळणी केली. त्यात तथ्य आढळून आले. लाचखोर सुपे याने गुरुवारी (ता 30) सायंकाळी त्रंबक रोडवरील पंचायत समिती येथे लाचेची रक्कम घेऊन तक्रारदारास बोलाविले.

त्यानुसार लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचला आणि लाचखोर सुपे यास रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी आधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलिमा केशव डोळस, पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलिस नाईक प्रभाकर गवळी, पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलने शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशन मागचं कारण काय? स्टोरी ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान Video Viral

Latest Marathi News Live Update: सुरत हायड्रोजन रेल्वे साइटवर केंद्रीय मंत्रींची पाहणी

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवा अन् ४० लाखांचा फंड मिळवा, 'ही' स्कीम माहिती आहे का?

लगाच्या १२ वर्षानंतर घेतला घटस्फोट; आता मुलाचा एकट्याने सांभाळ करतेय मराठी अभिनेत्री; , म्हणते- त्याला माझी गरज...

Crime: वृद्ध महिलेचं ३५ वर्षीय मजुरासोबत प्रेमाचं सूत जुळलं; एकत्र राहण्यासाठी भयंकर कृत्य केलं, जे घडलं त्यानं कुटुंब हादरलं

SCROLL FOR NEXT