Death esakal
नाशिक

Nashik News : मिरगाव शिवारात आढळला अनोळखी तरुणाचा भाजलेला मृतदेह!

Nashik News : सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास श्री. शेळके शेतात मका पेरणीसाठी गेले असतात इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरच्या जवळ अनोळखी तरुण बेशुद्ध पडल्याचे आढळून आले अन...

सकाळ वृत्तसेवा

वावी : सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात शेतातील विद्युत ट्रांसफार्मर जवळ वीस ते पंचवीस वयोगटातील अनोळखी तरुणाचा भाजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. (burnt body of unknown youth found in Mirgaon)

मिरगाव येथील सचिन प्रभाकर शेळके यांचे शेती गट नंबर 606 मध्ये इलेक्ट्रिक ट्रांसफार्मर आहे. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास श्री. शेळके शेतात मका पेरणीसाठी गेले असतात इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरच्या जवळ अनोळखी तरुण बेशुद्ध पडल्याचे आढळून आले.

त्याचे शरीर भाजलेल्या अवस्थेत होते. त्याचे बाबत त्यांनी स्थानिक पोलीस पाटलांना माहिती दिली. वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हवालदार हिले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासणी केली असता सदर तरुण मृत असल्याचे आढळून आले. (latest marathi news)

इलेक्ट्रिक ट्रांसफार्मरला स्पर्श केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृताच्या अंगात एकावर एक तिन शर्ट घातलेले होते. आतील बाजुस दोन फुलबाहीचे शर्ट त्यात एक आकाशी रंगाचा व एक पिवळ्या रंगाचे पट्टे असलेला शर्ट होता व वरुन लाल रंगाचा हाफ बाहीचा टी शर्ट, काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, कंबरेस निळा आकाशी रंगाचा कंबर पट्टा त्यावर स्वामी आत्मानंद इंग्लिश मिडीयम स्कुल स्किम, छत्तीसगढ असे बक्कल असलेला, डोक्यास काळे केस, मीशी बारीक, दाढी बारीक, शरिरयष्टी सडपातळ, रंग गोरा या प्रमाणे वर्णन असलेल्या अनोखी तरुणाबद्दल माहिती असल्यास वावी पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक निरीक्षक श्री. पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : वर्ध्यात भटक्या कुत्र्याचा हैदोस, दिवसभरात तब्बल १९ जणांना चावा

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT