Damage to vehicles due to luxury and truck accident on river bridge near Deshmane village. esakal
नाशिक

Nashik Accident News : देशमानेजवळ लक्झरी- ट्रक अपघातात बसचा चालक ठार!

Nashik News : नाशिक-संभाजीनगर राज्य महामार्गावर सकाळी भाविकांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी बस आणि ट्रकमध्ये समोरासमोर अपघात होऊन लक्झरी बसचालक जागीच ठार झाला.

सकाळ वृत्तसेवा

येवला : तालुक्यातील देशमानेजवळ नाशिक-संभाजीनगर राज्य महामार्गावर सकाळी भाविकांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी बस आणि ट्रकमध्ये समोरासमोर अपघात होऊन लक्झरी बसचालक जागीच ठार झाला. तर अकरा भाविक जखमी झाले. लक्झरी बस जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे ६० भाविकांना घेऊन केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, दोन धाम यात्रेसाठी निघालेली होती. (Bus driver killed in luxury bus truck accident near Deshmane)

८ जून रोजी त्र्यंबकेश्‍वर येथे दर्शन घेऊन अवघ्या दोन ते तीन तासांचा प्रवास करून भाविक जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे घरी पोहचणार होते. शनिवारी (ता. ८) सकाळी जालन्याहून लासलगाव येथे खतांच्या गोण्या घेऊन ट्रक चालला होता. लक्झरी बस (क्र. एमपी-३०-पी-०३९७) नाशिकहून छत्रपती संभाजींनगरकडे जात होती.

तर मालवाहू ट्रक (क्र. एमएच-४३-यु-३२३२) हा येवल्याकडून लासगावकडे जात होता. देशमानेजवळ असलेल्या जुन्या पुलाचे काम सुरू असल्याने नवीन पुलावरून एकेरी वाहतूक सुरू असल्याने बस चालकाच्या लक्षात आली नाही. यामुळे समोरुन आलेल्या ट्रक व बसमध्ये समोरासमोर अपघात झाला. यावेळी बस चालकाने दुभाजकाला कट मारल्याने बस रस्त्याच्या पलिकडे शेतात गेली.

या अपघातात बसचालक जगदीश जाट चौधरी (वय ४०, रा.जयपूर) हा ठार झाला. तर बसमधील अकरा प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये रावसाहेब अंबादास पाचारने, चंद्रकला भानुदास पाचरने, शांताबाई पाचरने, सुमंबाबाई ज्ञानदेव पाचरने (सर्व रा. पानशेंदरा, ता. जि. जालना), मंगलबाई नामदेव सुस्ते (रा. आडगाव, ता. कन्नड), महानंदा गोविंद शेंडगे (रा. मंगळूर, ता. मानवद, जि. परभणी), जन्ना दत्तराव पवार. (latest marathi news)

दत्तात्रय आप्पाराव पवार (दोन्हीही रा. वझुर, ता. पूर्णा, जि.परभणी), माधव उत्तम गाडे (रा. रिधोरा, ता. शेणगाव, जि.हिंगोली), विष्णू दादाराव पाचरने, निर्मला विठ्ठल पाचरने (दोन्हीही, रा पानशेंदरा) यांचा समावेश आहे.

तालुका पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षवर्धन बहिर, पोलिस कर्मचारी सागर बनकर आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना मदतकार्य करून रुग्णवाहिकेद्वारे येवला उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.

अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ट्रकचे देखील पुढील काही बाजूचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दौलत ठोंबरे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT