After the accident, municipal employees removing small encroachments from Aurangabad Naka to Nandur Naka by encroachment department esakal
नाशिक

Nashik Bus Fire Accident : अपघातानंतर NMC ॲक्शन मोडवर

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल सिग्नलवर शनिवारी (ता. ८) पहाटे झालेल्या भीषण अपघातात १२ निष्पाप बळी गेले, तर ४१ जण जखमी झाले. अपघाताला कारणीभूत असलेले चौकाच्या आजूबाजूचे अतिक्रमण, अरुंद रस्ता, टर्निंग पॉइंट, सिग्नल यंत्रणा, चौकातील रस्त्याचे रुंदीकरण याबाबत आता महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. (Nashik Bus Fire Accident NMC on action mode after accident Nashik Latest Marathi News)

वारंवार अपघात घडणाऱ्या जागांवर उपाययोजना करा, अशी मुख्यमंत्र्यांनी दिलेली ताकीद दिल्यानंतर तसेच पालकमंत्री व इतर लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांनंतर महापालिकेतील संबंधित विभाग जोरदार कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत पंचवटी अतिक्रमण विभागाकडून औरंगाबाद नाका ते नांदूर नाका व अमृतधाम ते जय शंकर गार्डनपर्यंतचे रस्त्यावरील अतिक्रमण काढून घेण्यात आले व पक्के अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

तसेच नगरनियोजन विभाग, पंचवटी यांच्याकडून चौकाच्या विस्तारीकरणाबाबत तसेच टर्निंग पॉइंट विस्तृत करण्याबाबत सर्व्हे करण्यात आला असून, काही ठिकाणी रेखांकन करण्यात आले आहे. उर्वरित रेखांकनाचे काम येत्या काही दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. चौकालगत असणाऱ्या व रस्ता विस्तारीकरणात बाधित होणाऱ्या सर्व पक्क्या अतिक्रमणधारकांना पंधरा दिवसांच्या आत अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा देण्यात आलेले आहे.

मुदतीत अतिक्रमण काढल्यास मनपा सदरचे अतिक्रमण तोडून काढणार असून, त्याचा खर्च अतिक्रमण धारकाकडून वसूल करण्यात येणार आहे. अशा सूचनादेखील देण्यात आलेल्या आहे. मात्र मनपाकडून देण्यात आलेली पंधरा दिवसांची मुदतीनंतर मनपाचे अधिकारी कर्मचारी राजकीय दबावापोटी तग धरतील का की, फक्त कागदोपत्री औपचारिकता पूर्ण होते हे येत्या काळात दिसून येईल.

अधिकारी अनभिज्ञ

मिरची चौकाच्या आजूबाजूला विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असल्याने सदर अतिक्रमण मनपाकडून काढण्यात येते की, फक्त नोटीस देण्याची औपचारिकता साधली जाते याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. रस्त्यातील टर्निंग पॉइंटच्या मधोमध येणाऱ्या विद्युत वितरण विभागाच्या इलेक्ट्रिक पोलबाबत मनपाकडून कुठलाही पत्रव्यवहार अथवा कारवाई करण्यात आलेली नाही. त्याबाबत महावितरण विभागातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता, त्याबाबत ते अनभिज्ञ असल्याचे आढळून आले.

सपत्नीक वागणुकीची चर्चा

औरंगाबाद रोड भागातील रस्त्यालगत छोटा व्यवसाय करणारे, फेरीवाले, टपरीवाले यांचे अतिक्रमण मनपाकडून त्वरित काढण्यात आले. मात्र याच रस्त्यावर राजकीय पुढाऱ्यांचे असलेले पक्के अतिक्रमण काढण्यास त्यांना वेळ देण्यात आल्याने अशा सापत्न वागणुकीची औरंगाबाद रोडवरील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT