nashik crime news sakal
नाशिक

नाशिक : व्यावसायिकाचे अपहरण करून खून; मालेगाव जवळ सापडला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक रोड परिसरात फर्निचर बनविणाऱ्या व्यावसायिकाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याने नाशिक शहरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सिन्नर फाट्या जवळील एकलहरे रोड वरील शाळेचे बेंच बनविणा-या कारखान्याचे संचालकाचे अपहरण करत मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कालव्यात मृतदेह मिळून आला, मृत सोनवणे यांच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शिरिष गुलाबराव सोनवणे (५६) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सिन्नर फाट्या जवळील स्वस्तिक फर्निचर, या कारखान्याचे मालक शिरिष गुलाबराव सोनवणे (५६) रा. फ्लॅट नं ए-१०३, किंग्स कोर्ट, के.जे.मेहता हायस्कुल जवळ पासपोर्ट ऑफिस शेजारी नाशिकरोड, हे शुक्रवारी (दि.९) दुपारी साडे चारच्या सुमारास कारखान्यात असतांना एका स्विफ्ट कारच्या चालकासह तीन व्यक्तीपैकी एकाने कारखान्याचा कर्मचारी फिरोज लतिफ शेख याला मालक सोनवणे यांना ऑर्डर द्यायची आहे असे सांगून गाडी जवळ बोलावण्यासाठी सांगितले, मात्र, फिरोज याने आपणच कारखान्यात चला असा आग्रह धरला असता, गाडीतील व्यक्ती अपंग असून चालता येत नाही असे सांगत मालक सोनवणे यांना पेन व वही घेऊन गाडीत बोलवा, असे सांगितल्यावर सोनवणे हे सदर गाडीत बसले.

दरम्यान फिरोज यास चहा आणण्यासाठी सांगण्यात आले, चहा देऊन फिरोज हा कारखान्यात गेला, बराच वेळ गेल्यानतंर मालक कारखान्यात आले नाही, परंतू सदर गाडी वळून सिन्नरफाटाच्या दिशेने जातांना कामगारांनी पाहिली, त्यानंतर सोनवणे यांच्या पत्नी उज्वला यांनी कारखान्यातील एका कामगाराला फोन करुन पती शिरिष यांचा फोन बंद येत असल्याचे सांगून विचारणा केली, यावेळी कामगारांनी बाहेर पाहिले असता मालक सोनवणे दिसून आले नाही, या नंतर शोधाशोध झाल्यानंतर फिरोज याने शनिवारी (दि.१०) नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यामुळे व्यावसायिकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली असून नाशिक शहरात गुन्हेगारीने डोके वाढ काढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT