Installation of CCTV in Central Market started under Smart City esakal
नाशिक

Nashik Central Market : नाशिक सेंट्रल मार्केट CCTVच्या कक्षेत; स्मार्ट सिटीअंतर्गत कॅमेरे बसविण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Central Market : स्मार्ट सिटीअंतर्गत भद्रकाली येथे नव्याने उभारण्यात येत असलेले नाशिक सेंट्रल मार्केट सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणण्यात येत आहे. भद्रकालीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोनवणे यांच्या हस्ते या मार्केटमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या प्रत्यक्ष कामास नुकतीच सुरवात करण्यात आली. (Nashik Central Market under CCTV Installation of cameras under Smart City begins nashik news)

भद्रकाली परिसराची नागरिकांमध्ये असलेली प्रतिमा बदलून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या भागात नाशिक सेंट्रल मार्केट उभारण्यात आले आहे. भविष्यात शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून हे मार्केट उदयास येणार आहे.

त्यानिमित्ताने महापालिकेतर्फे या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. महापालिकाही होतकरूंना रोजगार उपलब्ध करण्यासाठी मार्केटमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा टप्प्या-टप्प्याने उपलब्ध करून देत आहे.

मार्केट तयार झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, अनधिकृत घटनांना आळा बसावा या हेतूने संपूर्ण मार्केट सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक सेंट्रल मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी मार्केटमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले होते.

आयुक्तांनी त्याची त्वरित दखल घेत अवघ्या वीस दिवसांत मार्केटमध्ये प्रत्यक्ष सीसीटीव्ही बसविण्याच्या कामास सुरवात केली आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत.

भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोनावणे यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन झाले. यावेळी नाशिक सेंट्रल मार्केटचे अध्यक्ष चेतन शेलार, निलेश शेलार, विजय जाधव, योगेश बकरे, मुज्जू शेख यांच्यासह परिसरातील नागरिक आणि व्यापरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT