Decoration of Chaitrotsavam of Saptshringadevi.
Decoration of Chaitrotsavam of Saptshringadevi. esakal
नाशिक

Saptashrungi Devi Chaitrotsava : सप्तशृंगीदेवीचा उद्यापासून चैत्रोत्सव; भाविकांसाठी ठिकठिकाणी सुविधा

दिगंबर पाटोळे, सकाळ वृत्तसेवा

Saptashrungi Devi Chaitrotsava : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवास दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर मंगळवार (ता. १६)पासून प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवासाठी सप्तशृंगीदेवी ट्रस्ट, सप्तशृंगगड ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, मंडळे तसेच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. (nashik Chaitrotsav of Saptashrungi Devi from tomorrow in vani marathi news)

आदिमाया सप्तशृंगीच्या वर्षभरातील वेगवेगळ्या उत्सवांपैकी एक प्रमुख उत्सव असलेला चैत्रोत्सव चैत्र शुद्ध ८ दुर्गाष्टमी मंगळवार (ता. १६)पासून सुरू होत आहे. २३ एप्रिलपर्यंत या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. उत्सवकाळात रोज सकाळी सातला भगवतीची पंचामृत महापूजा होईल. मंगळवारी सकाळी नऊला भगवतीच्या नवचंडी यागाने चैत्रोत्सवास प्रारंभ होत असून, दुपारी साडेतीनला भगवतीच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात येईल.

सोमवारी (ता. २२) यात्रोत्सवातील महत्त्वाचा दिवस असून, या दिवशी खांदेशवासीयांसह कसमा पट्ट्यातील लाखो पदयात्रेकरू शेकडो किलोमीटरवर मजल-दरमजल करीत गडावर दाखल होणार आहेत. याच दिवशी दुपारी साडेतीनला न्यासातर्फे ध्वजाचे विधिवत पूजन करण्यात येईल. ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी-पाटील यांच्याकडे ध्वज सुपूर्द केल्यानंतर कीर्तिध्वजाची सवाद्य मिरवणूक निघेल. त्याच दिवशी रात्री बाराला कीर्तिध्वज गडाच्या शिखरावर फडकवतील.

यात्रेत प्लॅस्टिकबंदी व स्वच्छतेच्या दृष्टीने प्राधान्य देण्यात येत असून, भाविकांची तहान यंदाही ट्रस्ट, ग्रामपंचायत व प्रशासनास पाण्याच्या टँकरद्वारेच भागवावी लागणार आहे. यात्रा कालावधीत नांदुरी ते सप्तशृंगगड रस्ता खासगी वाहनांसाठी बंद करण्यात येणार असल्याने नांदुरी ते सप्तशृंगगड यादरम्यान तसेच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव विभागांतून बस सोडण्याबाबत परिवहन विभागाने नियोजन केले आहे.(latest marathi news)

गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही ट्रस्टतर्फे शिवालय तलाव परिसरात हजारावर भाविकांची निवासाची सोय होईल, असे दोन वॉटरप्रूफ निवाराशेड उभारण्यात येणार आहेत. पहिली पायरी प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्व मार्गांवर भाविकांचा उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी सावलीसाठी अच्छादन टाकण्यात येणार आहे.

यात्रा कालावधीत असे असेल नियोजन

* शिवालय तलाव परिसरात रोज दुपारी दोनला भागवत कथा

* रात्री साडेआठ ते साडेदहापर्यंत कीर्तन व शाहिरांचा जागर

* वीस ठिकाणी डिजिटल सूचना फलक

* २५६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमार्फत निगराणी

* १५ ठिकाणी बाऱ्या लावण्यासाठी व्यवस्था

* मंदिर २४ तास खुले राहणार

* बागलाण अॅकॅडमीचे १२०, अनिरुद्ध ॲकॅडमीतील २०० स्वयंसेवक

* ट्रस्टमार्फत यात्रा कालावधीत सकाळी अकरापासून मोफत भोजन

* १२ आरओ पाणपोई, आठ ठिकाणी वॉटर कूलरची व्यवस्था

* २४ तास वैद्यकीय सेवा व मोफत औषधोपचार

* भाविकांसाठी सप्तशृंगीदेवी ट्रस्टचा दोन कोटींचा जनसुरक्षा विमा

* ​दर्शनासाठी मंदिरात तीन ठिकाणी दर्शन पादुकांची व्यवस्था

* नारळ मंदिरात न नेता पहिल्या पायरीजवळ व्यवस्था

* परशरामा बाला प्रदक्षिणा मार्ग बंद असणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT