Hemant Godse, Chhagan Bhujbal, Rajabhau Waje & Vijay Karanjkar
Hemant Godse, Chhagan Bhujbal, Rajabhau Waje & Vijay Karanjkar esakal
नाशिक

SAKAL Special : चालता-बोलता! घोळ मिटवा...उमेदवार ठरवा

सकाळ वृत्तसेवा

घोळ मिटवा... उमेदवार ठरवा

लोकसभा निवडणुकीसाठी अनेक मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करत भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा गट), राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट), कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातही ठाकरे गटाने उमेदवारी घोषित करत आघाडी घेतलेली असली तरी, महायुतीचे अद्यापही काही ठरत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ नेमका कोणाला कोण उमेदवार या चर्चा गल्लोगल्ली रंगत आहे. जिल्हा परिषदेच्या आवारातही यावर खमंग अशी चर्चा रंगली. यात नाशिकची जागा शिंदे सेनेलाच मिळणार तर, ही जागा राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला सोडल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात होते.

यात एका अभ्यासकाने भाग घेत जागा राष्ट्रवादीला सोडल्याचे सांगत उमेदवार कोण असणार हे सांगितले. मात्र, ही चर्चा काही थांबेना. यात एका पक्षाचे नेते या चर्चे दरम्यान दाखल झाले त्यावर काही कार्यकर्त्यांनी त्यांनाच घोळ मिटवा व उमेदवार ठरवा असे साकडे घातले. (nashik Chalta bolta loksabha constituency election 2024 news)

इकडून तिकडून वाद्यांचा गजर

लग्नघर म्हटले, की गडबड गोंधळ आलाच. रात्री उशिरापर्यंत नाच-गाणे, मनोरंजनात्मक कार्यक्रमांची तर रेलचेल असते. एका लग्नसोहळ्यात पहाटे तीनपर्यंत हे सगळे कार्यक्रम आटोपल्यावर थोड्यावेळासाठी वऱ्हाडी मंडळी झोपली. एका मुलीला काहीकेल्या झोप लागेना. एवढ्या रात्री ही मुलगी झोपत का नाही म्हणून एक म्हातारी तिला विचारते.

ती आजीला जवळ बोलवते आणि आजूबाजूला येणारे आवाज तिला ऐकवते. एका बाईचे घोरणे झाले, की दुसरीचे लगेच सुरु व्हायचे. दोन्ही बाजूला हे वाद्य सुरू असताना मला झोप कशी येईल असे तिने आजीबाईंना सांगितले, त्यावर आजीबाई तिला काहीच उत्तर न देता तेथून निघून जातात, कारण त्याही या वाद्यवृंदाच्याच घटक होत्या, आता बोला! (latest marathi news)

साहेब इ-चलन मशीन कुठयं?

वाहतूक सुरक्षेची कमान हाती असलेल्या वाहतूक पोलिसांकडून नियम मोडणाऱ्यांवर चलन टाकताना मोबाईलद्वारे कारवाई करण्यात येत होती. यावर माध्यमांमधून प्रकाश टाकण्यात आला अन् इ-चलन मशिनद्वारेच कारवाई करा असा सक्त आदेश वरिष्ठांकडून वाहतूक पोलिसांना प्राप्त झाला.

तरीही काही पोलिस महाशय कारवाई करताना हातात मोबाईल घेतातच. मात्र आता त्यांना नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील एका एकेरी वाहतूक असणाऱ्या मार्गावरुन एक तरुण दुचाकीवरून चुकीच्या बाजूने येत होता.

त्याला थांबवत त्याच्यावर कारवाई करण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलिसदादाने मोबाईल त्याच्यासमोर धरताच तरुण म्हणाला, साहेब इ-चलन मशिन कुठयं, मोबाईलवरून कारवाई करणे चुकीचे आहे. पोलिसानेही निमूटपणे जा असे सांगितले. (latest marathi news)

कुणाचीही सुटते पुंगी?

लोकसभा निवडणूक जाहीर होऊन दोन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्यापही नाशिकमधील महायुतीतील उमेदवाराचा तिढा सुटू शकलेला नाही. अशीच चर्चा एका सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये सुरू होती. त्यावेळी एकाने नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे वाराणसीतून उमेदवारी केली आणि तेथील गंगाघाटाचा व शहराचा विकास घडवून आणला.

त्याचप्रमाणे, मोदींचे खंदेसमर्थन अमित शहा यांनी नाशिकमधून उमेदवारी करावी यासाठी दिल्लीत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितल्याचे त्याने ग्रुपवर सांगितले. शहा यांचे नाव येताच अनेकांनी दुजोरा दिला तर काहींनी गोडसे, भुजबळ यांचे काय होणार अशी चिंता व्यक्त केली. एकूणच सोशल मीडियावर कोण, कुठे, काय पुंगी सोडेल याचा नेम राहिलेला नाही. चर्चा मात्र होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT