अवकाळी पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी तडाखा Canva
नाशिक

नाशिक : चांदवड तालुक्याला अवकाळी पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी तडाखा

कांद्याचे नुकसान, छाटणी केलेल्या द्राक्षबागाही धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

रेडगाव : चांदवड तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाने मोठा तडाखा दिला असून, शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वाहेगाव साळ, वडाळीभोई परिसर, वडनेर भैरव, पिंपळणारे, वाकी या गावांना शनिवारी (ता. ९) दुपारी वादळी पावसाने झोडपून काढले. यामुळे सोयाबीन, मका, टोमॅटो, मिरची पिकासह कांद्याचे मोठे नुकसान झाले. पंधरा दिवसांपासून कमी - अधिक प्रमाणात सतत पाऊस पडत आहे. त्यात दोन दिवसांपासूनच्या धुव्वाधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. बहुतांशी खोलगट भागातील भुसार पिकेही पाण्याखाली आल्याने त्यांची गुणवत्ता निम्म्याहून अधिक घसरली आहे. चांदवड तालुक्यात खरीप कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. मात्र, या सततच्या पावसाने बुरशीजन्य रोग कांदा पिकावर आल्याने खरीप कांद्याचे उत्पादन ६० टक्क्यांनी घटण्याची भीती आहे.

पोळा सणानंतर रब्‍बी कांद्यासाठी टाकलेल्या सर्व रोपवाटीका खराब झाल्याने रब्बीची लागवड दोन महिने उशिरा होण्याची चिन्हे आहेत. परिणामी, डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत कांद्याचा मोठा तुटवडा जाणवू शकतो. शेतकऱ्यांनी चारवेळा कांदा रोपवाटिका टाकल्या. परंतु, पावसाने त्या पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे एक एकर कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांचा आतापर्यंत बियाण्यासाठी ४० हजार रुपयांपर्यंत खर्च होऊन गेला. हीच परिस्थिती द्राक्ष बागांची छाटणीनंतर झाली आहे. फुलोरा अवस्थेतील बागांना जोराच्या पावसाने फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे.

एकीकडे अस्मानी संकट शेतकऱ्यांना डोके वर काढू देईना तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही मदत करेना, अशी स्थिती आहे.

कांदा पिकावर प्रचंड खर्च झाला आहे. सततच्या पावसाने पूर्ण पिक वाया गेले. राज्यभर अतिवृष्टी होत असताना तत्काळ मदत का जाहीर होत नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणतीही मागणी केली नसताना त्यांना महागाई भत्ता वाढ होते. मग शेतकऱ्यांसाठीच पैसे नाही का?

- निवृत्ती न्याहारकर, शेतकरी, वाहेगाव साळ

कांदा, टोमॅटो, मिरची पिकांची पूर्ण वाताहत झाली आहे. सर्वत्र पाऊस पडत असल्याने सरकार पंचनाम्यांमध्ये का वेळ दवडत आहे. सरसकट मदत द्यावी. तरच शेतकऱ्यांना उभे राहता येईल.

- रावसाहेब लुकारे, शेतकरी, वाहेगावसाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women World Cup : भारतीय महिला संघ सेमिफायनलमध्ये तर पोहोचला, पण सामना नेमका कधी अन् कुणाशी होणार? जाणून घ्या समीकरण...

एकदम क्यूट! शशांक केतकराच्या लेकीला पाहिलत? दिवाळीनिमित्त शेअर केला खास फॅमिली फोटो

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळची कार जप्त; पुणे पोलिसांची जामखेडमध्ये कारवाई

Piyush Pandey Death : 'अबकी बार, मोदी सरकार' या घोषवाक्याचे जनक पियुष पांडे यांचे निधन; कॅडबरी, फेविकॉल, एशियन पेंट्ससारख्या जाहिरातींना दिलं नवं रूप!

Jayant Patil : जयंत पाटलांच्या साखर कारखान्याचे नाव रात्रीतून बदललं, गोपीचंद पडळकरांच्या मतदार संघातील साखर कारखाना कमानीवर वेगळचं नाव...

SCROLL FOR NEXT