Nashik Traffic Change
Nashik Traffic Change esakal
नाशिक

Nashik Traffic Change : शिवजयंती मिरवणुकीनिमित्त आज वाहतूक मार्गात बदल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Traffic Change : तिथीप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. २८) मिरवणूक काढली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल जाहीर केला आहे. दुपारी बारापासून मिरवणुक मार्ग वाहनांसाठी बंद राहणार असून, पर्यायी मार्गाचा तपशील वाहतूक शाखेने जारी केला आहे. (Nashik Change in traffic route today marathi news)

पोलिस उपायुक्‍त चंद्रकांत खांडवी यांनी आदेश जारी केले आहेत. त्‍यानुसार हातगाड्या, सायकल, मोटारसायकल, चारचाकी किंवा इतर सर्व प्रकारच्‍या वाहनांसाठी मिरवणुकीच्या मार्ग दुपारी बारापासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. वाहतुकीतील बदलामुळे निमाणी बसस्थानकावरून सुटणाऱ्या सिटी लिंक बस या पंचवटी डेपोतून सुटतील. (latest marathi news)

तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बस, किंवा इतर वाहने आडगाव नाका, कन्नमवार पुलावरून पुढे द्वारका सर्कलकडून जातील. तसेच पंचवटीकडे जाणारी वाहने याच मार्गाने वाहतूक करतील. रविवार कारंजा ते अशोकस्‍तंभ येथून सुटणाऱ्या सर्व बसेस शालिमार येथून सुटतील, असे आदेशात नमूद केले आहे.

असा आहे मिरवणूक मार्ग...

वाकडी बारव (चौक मंडई) येथून मिरवणुकीला सुरवात होणार आहे. तेथून दादासाहेब फाळके रोड, महात्‍मा फुले मार्केट, दूध बाजार चौक, भद्रकाली मार्केट, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, सांगली बँक चौक सिग्‍नल, महात्‍मा गांधी मार्ग, मेहेर सिग्‍नल, अशोकस्‍तंभ, नवीन तांबट आळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक मार्गे रामतीर्थ येथे समारोप होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT