chhagan bhujbal esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : फुलेंचा पुतळा विचारांच्या मजबूत पायावर उभा; लोकार्पण सोहळ्यात भुजबळांकडून विचारसरणीवर ठाम असल्याचा निर्धार

Latest Nashik News : फुले दांपत्याचा पुतळा विचारांच्या मजबूत पायावर उभा असल्याचे सांगताना भुजबळ यांनी फुलेंच्या विचारांना अनुसरूनच सरकारचे कार्य असल्याचे ठामपणे प्रतिपादन केले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यात हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारला पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या इंजिनची जोड मिळाल्यानंतर वैचारिक क्षेत्रात काहीसे टीकेचे धनी व्हावे लागलेल्या पक्षाच्या भूमिकेवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आजच्या कार्यक्रमांमधून विचारांची बैठक ठाम असल्याचे स्पष्ट संकेत दिले. फुले दांपत्याचा पुतळा विचारांच्या मजबूत पायावर उभा असल्याचे सांगताना भुजबळ यांनी फुलेंच्या विचारांना अनुसरूनच सरकारचे कार्य असल्याचे ठामपणे प्रतिपादन केले. (statue of mahatma phule idol inauguration at mumbai naka)

श्री. भुजबळ म्हणाले, महात्मा फुले यांनी जिवंत असताना वादळे-वाऱ्यांना टक्कर दिली. मृत्यूनंतरदेखील त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. नाशिकच्या गणेशवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते १९३१ मध्ये महात्मा फुलेंचा अर्धाकृती पुतळा बसविला. पुण्यातही त्यांच्या पुतळ्याला अनेकांनी विरोध केला.

महात्मा फुलेंचा विरोध ब्राह्मणांना नव्हता, तर ते ब्राह्मण्यवादाच्या विरोधात होते. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर हे देखील कोट घालायचे; मात्र फुलेंनी कोट घातल्यानंतर त्यालादेखील विरोध झाला. फुले यांना विरोध करणाऱ्यांमध्ये आमचेही काही लोक होते, हे आमचे दुर्दैव होते. भिडे वाड्यानंतर चिपळूणकर वाड्यात दुसरी शाळा फुले दांपत्याने काढली, तेथे देखील विरोध झाला, तेथेही आमचेच विरोधक होते.

फुलेंनी शोधली शिवसमाधी

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवरायांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली. पुण्याच्या हिरा बागेत सर्वप्रथम शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णयदेखील फुले यांनीच घेतला. एकूण २७ रुपये वर्गणी जमा झाली. त्यापैकी तीन रुपयांची वर्गणी ही महात्मा फुले यांनी दिली. पुतळ्यांसंदर्भात ताकही फुंकून पिले जात आहे. महापुरुषांचे पुतळे मजबूत असले पाहिजे, यात शंका घेण्याचे कारण नाही; मात्र काही लोकांनी पुतळा पडल्यानंतर राजकारण केल्याचे ते म्हणाले. (latest marathi news)

महायुतीचे समभावाचे मिशन

महायुतीत भाजप व शिवसेना हिंदुत्ववादी, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुरोगामित्वाचा वारसा सांगितला जात आहे. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांसमोर जाताना विकासाला सामाजिक एकतेची जोड देण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून होत असल्याचे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले.

भाजपच्या उद्‌घाटन कार्यक्रमात आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा व धनगर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन करताना सामाजिक समतोल उभारल्याचे दिसून आले. दुसरीकडे विकासकामांचे देखील उद्‌घाटने झाली. त्यामुळे महायुतीचे सरकारकडून निवडणुकीला सामोरे जाताना विकासाबरोबरच सामाजिक समभावाचे मिशनदेखील राबविले जात असल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT