As there is no price, the sheep and goats grazing in the fenugreek fields. esakal
नाशिक

Methi Price Fall: चिचोंडीच्या शेतकऱ्याने मेथीच्या पिकात घातल्या मेंढ्या- बकऱ्या! बाजारभावपेक्षा काढणीसह वाहतूक खर्च अधिक

Nashik News : मेथी मार्केटपर्यंत घेऊन जाण्यासही महाग झाल्याने भाजीच्या शेतात बकऱ्या-जनावरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

चिचोंडी (ता. येवला) : कमी पाण्यावर, तसेच भांडवल गुंतवून केलेल्या मेथीला सध्या मार्केटमध्ये भाव नसल्याने ही भाजी कवडीमोल ठरत असून, भाजीच्या एका जुडीस तीन ते पाच रुपये भाव मिळत आहे. ती मार्केटपर्यंत घेऊन जाण्यासही महाग झाल्याने भाजीच्या शेतात बकऱ्या-जनावरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. (nashik Methi Price Fall marathi news)

पावसामुळे खरीप पिकांनी दगा दिला. परिसरातील काही शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर मोठ्या आशेने मेथीची लागवड केली. सध्या मेथी भाजीच्या जुडीस शेकडा केवळ तीनशे ते पाचशे दर मिळत आहे. यामुळे झालेला खर्च निघणे अवघड झाले आह. यामुळे मेथीच्या शेतात जनावरे, बकऱ्या चरताना दिसत आहेत.

एकीकडे पिकात बदल म्हणून कांदा पिकाला फाटा देत चिचोंडी खुर्द येथील अनिल महाले यांनी ३० गुंठे क्षेत्रात स्पिंकलरच्या सहाय्याने मेथीची लागवड केली होती. सध्या भाव कोसळल्याने मेथीच्या हिरव्यागार पिकात त्यांनी मेंढ्या, बकऱ्या चारण्यासाठी सोडल्या. कांद्याची निर्यातबंदी, तर भाजीपाला पिकांनाही योग्य दर नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. (Latest Marathi News)

"शेतात भाजीची पूर्ण वाढ झाल्याने ती मजूर लावून उपटावी लागते. त्यानंतर त्या भाजीच्या जुड्या सुतळीने बांधून गाडीद्वारे मार्केटला घेऊन जावे लागते. हा खर्च पाहता सध्या तीनशे ते पाचशे रुपये शेकडा भावाने पडवणारा नाही. नाइलाजाने मेथीच्या शेतात जनावरे घालावे लागत आहेत. दहा ते १५ रुपये शेकडा मिळायला हवा, तेव्हा खर्च निघून दोन पैसे पडतात."

-अनिल महाले, शेतकरी, चिचोंडी खुर्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT