Actors like Sai, Pranjal, Palash, Swara, Shlok in lead roles in serials esakal
नाशिक

Nashik Child Artist : नाशिकच्या बालकलाकारांची अभिनय क्षेत्रात भरारी!

सई, प्रांजल, पलाश, स्वरा, श्लोक यांसारखे कलाकार मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Child Artist : चित्रपटासह मराठी मालिका, नाटकांमधील बालकलाकार चिरकाल स्मरणात राहतात. अशा भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना अलीकडील काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारून नाशिकचे नाव उंचावणाऱ्या बालकलारांविषयी माहिती ‘सकाळ’ च्या वाचकांसाठी.... (Nashik Child Artist Nashiks child artists in field of acting news)

सई मोराणकर

झी वाहिनीवरील सुरू असलेल्या ‘यशोदा : गोष्ट श्यामच्या आई’ ची या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत सई काम करत आहे. या अगोदर तिने कलर्स वाहिनीवरील ‘ज्ञानियांचा राजा’ या मालिकेत मुक्तीची भूमिका केली.

वयाच्या सहाव्या वर्षापासून अभिनय करणारी, महाराष्ट्र राज्यातील पहिली बालदिग्दर्शिका होण्याचा मान सईला मिळाला आहे. स्टार प्रवाहावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, झी युवावर साजणा आणि तू अशी जवळी रहा या मालिकांमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

कलर्स मराठीवर ‘तू माझा सांगाती’, झी मराठीवर ‘जय मल्हार’ आणि ‘ग्रहण’ अशा अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा तिने उमटवला आहे.

वयाच्या आठव्या वर्षापर्यंत तिने १४ मालिका व बाळकडू, शौर्य, विडा व प्रतिबंध या मराठी चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. बालमानसशास्त्रात तिला शिक्षण घ्यायचे आहे आणि नवनवीन दर्जेदार भूमिका साकारण्याचे तिचे स्वप्न आहे.

स्वरा कोरडे

स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ या मालिकेतील तारा हे पात्र साकारत आहे. अभिनेता शशांक केतकर यांची भाची म्हणून तिला दाखवण्यात आले आहे.या पात्रासाठी स्वराला स्टार प्रवाह करून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

स्टार प्रवाहावर प्रक्षेपित होणाऱ्या सर्व मालिकेतील बाल कलाकारांना हा पुरस्कार देवून सन्मानित केले. मविप्र शिक्षण संस्थेच्या होरायझन ॲकॅडमीतील इयत्ता पाचवीची ती विद्यार्थिनी आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून ती विविध अभियन करत आहे.

पलाश खैरनार

स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत पलाश आणि काम केलेले आहे. तसेच योगेश्वरचे शंकर या मालिकेतही आरुषचा बालमित्र म्हणून काम केले. मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये त्याने अभिनय केलेला आहे.

प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्याबरोबर नुकत्याच एका सिनेमाचे चित्रकरण त्याने पूर्ण केले. तसेच एका चित्रपटाच्या चित्रकारांना वेळी त्याचा अभिनय बघून स्वतः सुभाष घई यांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले. नाशिकमधील कलाकारांच्यादृष्टीने ही अत्यंत कौतुकास्पद बाब समजली जाते.

श्लोक नेरकर

सोनी मराठी वाहिनीवरील मालिका गाथा नवनाथांची यात बाल श्रीपाद श्री वल्लभ यांच्या भूमिकेत श्लोक सध्या काम करत आहे. या अगोदर त्याने योग योगेश्वर जय शंकर, घेतला वसा टाकू नको, जय जय स्वामी समर्थ व इतर मालिका तसेच सिनेमा व नाटकांमध्ये काम केलेले आहे. बालकलाकार म्हणून त्याच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्रांजल सोनवणे

अनेक लघुपटांमध्ये प्रांजल हिने काम केलेले आहे. नाशिकमधील विविध नाट्य संस्थेमध्ये ती नाटकांमध्ये काम करते. भक्ती बर्वे यांचे गाजलेले नाटक ‘ती फुलराणी’ यावर आधारित एकपात्री प्रयोग प्रांजल करत असते.

एकपात्री स्पर्धांमध्ये प्रांजल अनेक पारितोषिक मिळवले आहेत. तिचे वडील लेखक होते. त्यांचे काही वर्षांपूर्वी अकाली निधन झाले. त्यामुळे आपल्या वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रांजल अभिनय क्षेत्रात आत्मीयतेने काम करत

आहे. चित्रकलेतही ती पारंगत आहे. आईच्या मदतीने तिला अभिनय व चित्रकला या क्षेत्रात करिअर करायचे आहे.

आयुष दाभाडे

कलर्स वाहिनीवरील योगेश्वर जय शंकर या मालिकेमध्ये आयुष्य काम केले आहे. तसेच हिंदी सिनेमा छोटा क्रिश यामध्ये त्यांनी काम केलेले आहे. नाशिकमध्ये अनेक बालनाट्य संस्थांच्या बालनाट्यंमध्ये तो काम करत असतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मानरच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Kalyan Dombivli Elections: कल्याण डोंबिवलीत ठाकरे एकजुटीचे राजकीय संकेत; महापालिका रणधुमाळीपूर्वी हालचालींना वेग

Ambani gifts Lionel Messi : अनंत अंबानींकडून मेस्सीला 11 कोटींचं घड्याळ भेट! एवढं महाग का आहे Richard Mille घडयाळ? काय आहे खास?

Germany Jobs: ‘मेड इन महाराष्ट्र’ मनुष्यबळाला जर्मनीचे दरवाजे बंद? १० हजार तरुणांचे भविष्य टांगणीला

Nashik Marathi Vishwa Sammelan : नाशिकमधील 'मराठी विश्व संमेलन' लांबणीवर; जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत रंगणार सोहळा!

SCROLL FOR NEXT