order esakal
नाशिक

Nashik Child Labor Bribe Case: लाचखोर निशा आढाव यांना एका दिवसाची कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Child Labor Bribe Case : हॉटेलमध्ये बालकामगार नसल्याचा अहवाल देत गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात हॉटेल चालकाकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना कामगार उपायुक्त कार्यालयातील महिला निरीक्षक निशा बाळासाहेब आढाव (५३, रा. गंगापूर रोड) यांना अटक केली होती.

न्यायालयाने लाचखोर आढाव यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली होती. (Nashik Child Labor Bribe Case One day custody for bribe taker Nisha Adhav crime news)

लाचखोर निशा आढाव यांनी मंगळवारी (ता.१३) तक्रारदाराच्या हॉटेलमध्ये पाहणी करीत बाल कामगार आहे की नाही, याची खात्री केली.

तसेच हॉटेलमध्ये बाल कामगार असल्याची बतावणी करून तपासणी अहवालात बाल कामगार नसल्याचा अहवाल पाठविण्यासह गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात त्यांनी हॉटेल चालकाकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आढाव यांना गुरुवारी (ता. १५) कामगार उपायुक्त कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शुक्रवारी (ता.१६) लाचखोर आढाव यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आढाव या कामगार उपायुक्तालयात दुकान निरीक्षक म्हणून कार्यरत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

SCROLL FOR NEXT