Nashik Children Death Sakal
नाशिक

Nashik : झोका खेळता खेळता दोरीचा गळफास लागून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

हा चिमुकला अवघा १० वर्षाचा असल्याची माहिती समोर आली आहे.

दत्ता लवांडे

नाशिक : नाशिक येथे एका चिमुकल्याचा घरातच झोका खेळता खेळता मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या अंबड भागातील चुंचाळे आश्विनी नगर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीत ही घटना घडल्याची माहिती आहे. निखिल असं या चिमुकल्याचं नाव असल्याची माहिती समोर आहे.

अधिक माहितीनुसार, घरात कुणीही नसताना १० वर्षांचा निखील त्याच्या छोट्या भावासोबत खेळत होता. पण त्याने झोका गोल गोल फिरवल्यामुळे त्याच्या गळ्याला गळफास लागला आणि त्याचा यामध्ये मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर अंबड पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, निखिलला गळफास लागल्यानंतर त्याचा भाऊ आईकडे पळत गेला आणि "निखिल झोका खेळताना पडला आणि तो काहीच बोलत नाही" असं सांगतिलं. त्यानंतर आईने आल्यावर पाहिलं तेव्हा निखिल निपचीत पडला होता. आईने त्याच्या गळ्यावरील दोरी कापली पण त्याचा काही फायदा झाला नाही.

या घटनेनंतर निखिलच्या आईने हंबरडा फोडला, आवाज ऐकून शेजारचे लोकं जमा झाले. त्यांनी निखिलला जिल्हा रूग्णालयात दाखल केले पण त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. पण या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपलेही लहान मुले घरात किंवा अंगणात खेळत असतील तर अशा गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पालकांच्या निष्काळजीपणामुळे अनेक चिमुकल्यांचे जीव गेल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Donation Details: चार वर्षांत अयोध्येतल्या राम मंदिराला किती दान मिळालं? सोनं आणि पैसा बघून बसेल धक्का!

IND vs AFG 3rd ODI: रोहित - जैस्वालने एकही चेंडू न खेळताही भारताला मिळाल्या ५ धावा, पण का? जाणून घ्या खरं कारण

Raigad Drone Row: रायगडावर शिवप्रेमींच्या नैसर्गिक विधीचे ड्रोन चित्रीकरण; लौकिक गोळे यांच्यावर आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Omraje Nimbalkar : पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालाबाबत उच्च न्यायालयात जाणार

Balewadi News : पदपथावर बेकायदेशीर कूपनलिका (बोअरवेल) खोदकाम? जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT