Police personnel giving instructions regarding the closure of entry for heavy vehicles.
Police personnel giving instructions regarding the closure of entry for heavy vehicles.  esakal
नाशिक

Nashik News : अवजड वाहनांना ‘ब्रेक’ लागल्याने नागरिक सुखावले! पोलिसांच्या निर्णयाचे स्वागत; इंदिरानगरवासीयांना आनंद

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिसूचना काढल्याप्रमाणे ४ मेपर्यंत इंदिरानगर, वडाळा आणि पाथर्डीमार्गे होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद झाल्याने इंदिरानगरवासीयांनी आनंद व्यक्त केला आहे. तब्बल चार वर्षानंतर या रस्त्यांवरील अवजड वाहने हटल्याने सर्वच परिसरातून पोलिसांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. ४ मेनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे असे असले तरी तरी कायमस्वरूपी ही वाहतूक बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (Nashik indiranagar heavy vehicles stopped)

१ फेब्रुवारी २०२० पासून मुंबईकडे वाहणारी जाणारी वाहने द्वारकामार्गे न जाता या भागातून जात होती. तसेच पाथर्डी फाटा भागातून पुण्याकडे जाणारी वाहने येथून ये- जा करत असतं. त्यामुळे झालेल्या ४१ अपघातात काहींना जीव गमवावा लागला, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

अवजड वाहन विरोधी कृती समितीच्या माध्यमातून आमदार, माजी नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सामाजिक मंडळे या विरोधात रस्त्यावर उतरली होती. आंदोलने झाली. विविध ठिकाणी निवेदने देण्यात आली. मात्र ही वाहतूक हटत नव्हती. अखेर प्रायोगिक तत्त्वावर का असेना आजपासून सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत अवजड वाहनांना येथे बंदी घालण्यात आली.

मुंबईकडची वाहने फेम सिग्नलमधून वडाळ्याकडे न येता द्वारका चौफुलीच्या रॅम्पवरून मार्गस्थ झाली. तर पुण्याकडे येणारी वाहने सरळ येत होती. प्रत्येक वळण रस्त्यावर वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात केले होते. त्यामुळे एकही वाहन इथून गेले नाही. रात्री दहा ते सकाळी आठ दरम्यान पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना पाथर्डी फाटा इंदिरानगर या भागातून मात्र परवानगी देण्यात आली आहे.

परिसरात मोठ्या संख्येने असलेल्या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला सर्वच या समस्येने त्रस्त झाले होते. त्यामुळे येथील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळाले. (latest marathi news)

दरम्यान पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचे माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी सभागृहनेते सतीश सोनवणे, चंद्रकांत खोडे, माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे, सुनील खोडे, सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी, यशवंत निकुळे, रूपाली निकुळे, सुदाम डेमसे, भगवान दोंदे, संगीता जाधव, पुष्पा आव्हाड, शाहीन मिर्झा यांच्यासह कृती समितीचे सदस्य रमिझ पठाण, जय कोतवाल, ऋषिकेश वर्मा, विनोद दळवी, सागर देशमुख, आकाश खोडे, प्रकाश खोडे, प्रवीण जाधव, गौरव सोनार, योगेश दिवे आदींनी स्वागत केले आहेत.

"सर्व नागरिक, सामाजिक तसेच राजकीय पक्षांनी आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून यासाठी एकत्रित लढा दिल्याने ही समस्या सुटली आहे. पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सरांनी वास्तविक परिस्थिती समजून घेत पोलिस आयुक्तांना नागरिकांची भूमिका पटवून देत निर्णय घेतल्याने हे शक्य झाले आहे."- रमिझ पठाण, कृती समिती सदस्य

"एका मोठ्या समस्येतून सुटका होत असल्याचे समाधान आहे. पोलिस प्रशासनाचे खूप आभार. घरातील ज्येष्ठ नागरिक बाहेर गेल्यानंतर अवजड वाहनांच्या भीतीपोटी ते घरी येईपर्यंत सतत भीती वाटायची. ही अवजड वाहतूक येथून कायमची बंद झाली पाहिजे."

- रामदास बच्छाव, स्थानिक नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT