Nashik city bus service esakal
नाशिक

नाशिक | ST संपामुळे सिटीलिंक मालामाल; रोजचा गल्ला 10 लाखांपुढे

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेकडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या सिटीलिंक बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला असून, रोजचा महसूल दहा लाखांच्या वर पोचला आहे. परिणामी तोटा कमी होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या संपाचा परिणाम असला तरी प्रवाशांनीदेखील खासगी प्रवास न करता सिटीलिंकलाच प्रतिसाद दिला आहे. विशेष करून शहरी भागापेक्षा दिंडोरी, ओझर, त्र्यंबकेश्‍वर, भगूर, मखमलाबाद या ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राज्य परिवहन महामंडळाने शहर बससेवा तोट्यात असल्याचे कारण देत महापालिकेने बससेवा सुरू करण्यासाठी दबाव आणला. त्यानुसार राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची सत्ता असल्याने बससेवा महापालिकेने चालविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिकेने ८ जुलैपासून बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पाच टप्प्यांमध्ये अडीचशे बस रस्त्यावर उतरविण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत ३९ मार्गांवर १२० बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या असून, पुढील आठवड्यात आणखी चार नवीन मार्ग सुरू केले जाणार आहे. बसची संख्यादेखील वीसने वाढविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात डिझेल व सीएनजी बस चालविल्या जात आहेत. ७२ रुपये प्रतिकिलोमीटर बस ऑपरेटर कंपन्यांना पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे एकावेळी सर्व बस सुरू करण्यात आल्या नाहीत. ऑक्टोबर महिन्यापासून राज्य शासनाने कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बससेवेला मागणी वाढली. शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीदेखील प्रवाशांची गर्दी असल्याने त्यातून रोजचा महसूल दहा लाखांच्या पुढे पोचला आहे. किलोमीटर मागे सिटीलिंक कंपनीला सुमारे ५२ रुपये मिळतात. संपूर्ण बस रस्त्यावर उतरविल्यानंतर प्रवाशांची गर्दी वाढून तोटा सहजपणे भरून निघेल, असा दावा केला जात आहे.

संपामुळे ग्रामीण भागातून मागणी

गेल्या वीस दिवसांपासून एसटीचा संप सुरू आहे. परिणामी ग्रामीण भागात खासगी बससेवेला परवानगी देण्यात आली असली तरी या भागात सिटीलिंकच्या बससेवेलाच अधिक पसंती मिळत आहे. दिंडोरी, ओझर, त्र्यंबकेश्‍वर, भगूर, मखमलाबाद या भागातून अधिक मागणी वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhimashankar Temple : सर्वांसाठी नियम वेगळे; भाजप नेत्यासाठी वेगळे? भाविकांना अडवले, खासदाराला प्रवेश; भीमाशंकर मंदिरात वाद

वाहन नोंदणी-लायसन्सची माहिती आता व्हॉट्सअ‍ॅपवर; परिवहन विभागाची नवी सेवा, २४x७ चॅटबॉट सुरू होणार

Sangli Gas Cylinder : ‘आमचा गॅस सिलिंडर कुणी पळवला?’ ग्राहकांचा संताप एजन्सींचा काळा बाजार, सर्वत्र लागल्या रांगा

Education News : पुढील तीन वर्षांत पहिली ते बारावीचा कायापालट; जाणून घ्या तुमच्या पाल्याच्या इयत्तेचा नंबर कधी?

LPG Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; आता LPG पुरवठ्यावर नजर राहणार

SCROLL FOR NEXT