Nashik City Bus KM_SAKAL
नाशिक

नाशिक शहर बससेवेची यशस्वी वाटचाल; महिनाभरातच ६५ लाखांचा महसूल

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेतर्फे सुरु करण्यात आलेल्या शहर बससेवेला एक महिना पुर्ण झाला असून या काळात तब्बल तीन लाख प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून ६५ लाख रुपयांचा महसुल प्राप्त झाल्याचा माहिती समोर आली आहे.

महापालिकेतर्फे आठ जुलैपासून शहर बससेवा सुरु झाली. पहिल्या टप्प्यात तपोवन ते बारदान फाटा, तपोवन ते सिम्बायोसिस कॉलेज, तपोवन ते पाथर्डी गाव, सिम्बायोसिस कॉलेज ते बोरगड, तपोवन ते भगूर, नाशिक रोड ते बारदान फाटा, नाशिक रोड ते अंबड गाव, नाशिक रोड ते निमाणी, नाशिक रोड ते तपोवन या नऊ मार्गांवर मार्गांवर २७ बस सुरू करण्यात आल्या. त्यानंतर नाशिकरोड ते सिम्बॉयसिस कॉलेज, तपोवन ते अंबड, तपोवन ते पाथर्डी, तपोवन ते अंबड (कामटवाडे मार्ग) या नवीन चार मार्गांची भर पडली. मार्गिका वाढल्याने २३ बस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या ५२ बस कार्यान्वित

पहिल्या दिवशी तीन हजार प्रवाशी मिळाले त्यातून एक लाख ६५ हजार रुपये उत्पन्न मिळाले. बससेवेला दिवसागणिक प्रतिसाद मिळत आहे. प्रवासी संख्या वाढतं असल्याने बसची संख्या वाढविली जात आहे. शहरात सध्या ५२ बस सुरू आहेत. सिटी लिंक कंपनीच्या वतीने महिना भराचा आढावा घेतला असता तीन लाख प्रवाशी टप्पा ओलांडल्याचे स्पष्ट झाले.

प्रवाशी संख्येत सतत वाढ

कोरोनामुळे निर्बंध आहेत, त्यामुळे पुरेशा प्रमाणात बस रस्त्यावर धावत नाही. सध्या ५२ बस असून, ८ ते १८ जुलै या कालावधीत २७, तर १९ जुलैपासून २५ बस दाखल झाल्या आहेत. महिनाभरात दोन लाख ६२ हजार ३६१ किलोमीटर बस धावल्या. दोन लाख ८३ हजार २७२ प्रवाशी मिळाले. ५२६ ऑनलाइन तिकीट विक्री झाली असून, ८७ प्रवाशांनी पास काढले. अठरा जुलैपर्यंत आठ हजारांपर्यंत प्रवासी संख्या वाढली. १९ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत दररोजच्या प्रवासी संख्येमध्ये १४ हजार ८०० इतकी वाढ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! सोमवारी मध्यरात्रीपासून भाववाढीचा निर्णय, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Kalamboli Accident: नवी मुंबईत भरधाव कारचा थरार! डॉक्टरनं पदपथावरील पादचाऱ्यांना चिरडलं; लहान मुलांसह ४ जण गंभीर जखमी

Rahul Gandhi Defamation Case: पुण्यात राहुल गांधी मानहानी खटल्याला कडक कायदेशीर वळण! विशेष कोर्टातील उलटतपासात सात्यकी सावरकरांनी मान्य केला '१० दया याचिकां'चा ऐतिहासिक ताळेबंद

Kannad Accident : मद्यधुंद क्रूझर चालकाने बुलेटला चिरडले; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

Pune Developer Death: बांधकाम व्यावसायिक कपिल गांधी यांचे हृदयविकाराने निधन

SCROLL FOR NEXT