Nashik City Economic Offences Branch seized 60 properties of Kalkam fraud crime news esakal
नाशिक

Nashik Kalkam Fraud Crime : ‘कलकाम’च्या मालमत्तेवर टाच; पैसे संकलित करणाऱ्या एजंटांचा शोध

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : बहुचर्चित कलकाम रिअल इन्फ्रा लिमिटेड कंपनीने फिक्स आणि रिकरिंग आर्थिक गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह परराज्यांतील गुंतवणूकदारांना तब्बल सुमारे २५० कोटींचा गंडा घातला.

या प्रकरणी नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने ‘कलकाम’च्या ६० प्रॉपर्टीवर जप्तीची कारवाई केली.

या जप्त मालमत्तेचे व्हॅल्युएशन करण्याचे जिकिरीचे काम नाशिक आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कंपनीसाठी पैसे संकलित करणाऱ्या एजंटांचा शोध घेतला जात आहे. (Nashik City Economic Offences Branch seized 60 properties of Kalkam fraud crime news)

नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी कलकाम कंपनीचा संचालक विजय सुपेकर आणि मार्केटिंग डेव्हलपमेंट डायरेक्टर तुषार सोनार या दोघांना ठाण्यातील नालासोपाऱ्यातून अटक केली आहे. नाशिक शहरातील गुंतवणूकदारांची सुमारे ३० कोटींची फसवणूक कंपनीने केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले.

या प्रकरणात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने कलकाम कंपनीशी संबंधित संपत्ती आणि संचालकांची स्थावर मालमत्ता अशा ६० प्रॉपर्टीवर जप्तीची कारवाई केली आहे. या मालमत्तेपैकी ३५ मालमत्ता या पोलिसांनी दोन संशयितांच्या अटकेपूर्वीच जप्त केल्या होत्या; तर उर्वरित मालमत्ता संशयितांच्या चौकशीतून समजल्यानंतर जप्त केल्या आहेत. त्यामुळे या जप्त मालमत्तेचे व्हॅल्युएशन करण्याचे मोठे जिकिरीचे काम आर्थिक गुन्हे शाखेला करावे लागत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हे आहेत संशयित

कलकाम रिअल इन्फ्रा लिमिटेड या कंपनीचे मुख्य कार्यालय नवी मुंबईतील वाशी येथे असून, कंपनीचा चेअरमन विष्णू पांडुरंग दळवी, संचालक विजय सुपेकर व सुनील वांद्रे; तर मार्केटिंग डेव्हलपमेंट डायरेक्टर तुषार सोनार, देवानंद शर्मा, संतोष थोराटे, संदेश पडियार, अशोक बागूल आहेत. हे सर्व संशयित असून, त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसह संघटित गुन्हेगारींतर्गत राज्यभरात नऊ गुन्हे दाखल आहेत.

योगिता बैरागी यांच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिसांत गेल्या १२ ऑगस्ट २०२२ ला आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल असून, त्यानुसार फिक्स व रिकरिंगच्या ३४२ गुंतवणूकदारांची एक कोटी १७ लाख २९ हजार ५५३ रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याचा परतावा म्हणून कंपनीकडून दोन कोटी पाच लाख ५८ हजार ८४५ रुपये देणे असताना कंपनीने परतावा दिलेला नाही.

पोलिस तपासात नाशिक शहर-जिल्ह्यातील फसवणुकीची रक्कम सुमारे ३० कोटींपर्यंत पोचली आहे; तर महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्य प्रदेशातील गुंतवणूकदारांची सुमारे २५० कोटींची फसवणूक ‘कलकाम’च्या संचालकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजेला होणार सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT