While awarding the title of Best Dog in Dog Show to Google and Handler Ganesh Konde, Arun Chavan of Nashik City Police Commissionerate, Dr. Digvijay Patil. esakal
नाशिक

Bhopal Dog Show : नाशिक शहर पोलिसांचा ‘गुगल’ ठरला Best Dog! दुसऱ्यांदा सन्मान

प्रतीक जोशी

नाशिक : भोपाळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पोलिस कर्तव्य क्रीडा स्पर्धेमध्ये नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या गुगलने पहिल्या दहा क्रमांकात स्थान पटकावले होते.

रविवारी (ता. २६) त्र्यंबक रोडवरील ग्रेप कौंटी पार पडलेल्या डॉग शोमध्ये ‘गुगल’ने सलग दुसऱ्या वर्षी ‘बेस्ट डॉग’चा किताब पटकावला आहे. गुगलने यंदाही शहरातील तरबेज श्‍वानांना मागे टाकत बाजी मारली. (Nashik City Police Google became Best Dog second honor at Bhopal Dog Show nashik news)

त्र्यंबक रोडवरील ग्रेप कौंटी रिसोर्ट याठिकाणी पेट परफेक्ट क्लिनिकतर्फे ‘डॉग शो’ रविवारी (ता. २६) झाला. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यात शहरातील सुमारे १५० श्‍वानांनी सहभाग नोंदविला होता.

या वेळी झालेल्या कसरतींमध्ये नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शोधक ‘गुगल’ने सहभाग नोंदविताना विविध कसरतींमध्ये उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. झिकझॅक, जम्प, काउटिंग, स्विंग, शिस्तपालन याप्रकारात गुगलने बाजी मारली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

या वेळी सहभागी झालेल्या विविध जातीच्या श्‍वानांनी विविध प्रकारची वेशभूषा करीत लक्ष वेधून घेतले. ‘बेस्ट डॉग’चा किताब नाशिक आयुक्तालयाच्या गुगलला या शोचे आयोजक दिग्विजय पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

हॅन्डलर गणेश कोंडे, अरुण चव्हाण उपस्थित होते. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल हेही उपस्थित होते. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्यासह अधिकाऱ्यांनी गुगल व हॅन्डलर यांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

SCROLL FOR NEXT