Citylinc Employees Strike esakal
नाशिक

Nashik Citylinc Employees Strike: सिटी लिंक बससेवा पुन्हा ठप्प! वेतनाअभावी वाहक पुन्हा एकदा बेमुदत संपावर

सकाळ वृत्तसेवा

Nashik Citylinc Employees Strike : नाशिक महानगर पालिकेने मोठा गाजावाजा करीत शहर बससेवा सुरू केली. सिटीलिंक ठेकेदार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करीत नसल्याने सिटीलिंकच्या वाहकांना आंदोलन करावे लागत आहे.

ही बाब काही नाशिककरांना नवीन नाही. मागील महिन्यात १८ जुलैला कामबंद आंदोलन केले होते, मात्र २० जुलै रोजी झालेल्या बैठकीत ३० जुलै पावेतो वेतन करू असे आश्वासन वाहकांना मिळाले होते.

त्यांची पूर्ती न झाल्याने च पुन्हा एकदा आंदोलनाचा अस्त्र शुक्रवार (ता.०४) रोजी बाहेर काढले आहे. त्यामुळे सिटीलिंक सेवा ठप्प झाली. (Nashik Citylinc Employees Strike Carriers again on indefinite strike over payment issue)

नाशिक महानगरपालिकेने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली महापालिकेची बससेवा सुरू केली. ठेकेदार मार्फत सुरू असलेली सिटीलिंक बस सेवा शुक्रवारी (ता.०४) ठप्प झाली आहे.

त्यामुळे शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार, प्रवासी यांना अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली. जुलै महीन्यात दोन महिन्यांपासून

सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने वेतन न दिल्याने काम बंद आंदोलन केले होते. त्यावेळीं जवळपास तीन दिवस सुरू होते, २० जुलैला महापालिका प्रशासन व ठेकेदारा समवेत बैठक झाली होती.

यात ३० जुलै पावेतो वेतन देण्याचे आश्वासन देत इतर मागण्याचा भविष्यात विचार करू असे देखील सांगितले होते. परंतु वेतन देण्याचे आश्ववस्त करून देखील वेतन झाले नाही, यामुळे शुक्रवार ता. ०४ रोजी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळपासून तपोवन डेपोतुन एकही बस बाहेर पडली नाही. या आंदोलनात जवळपास ३०० पेक्षा कर्मचारी सहभागी झाले आहेत.

दोन महिन्यांपासून थकलेले वेतन यासह २२ मुद्द्यांवर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले असून, या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यावर हे कर्मचारी ठाम आहेत. गेल्या दोन वर्षांपासून वेतनवाढ झालेली नाही.

दर सहा महिन्यांनी वेतनात इन्क्रीमेंट होत असते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून ही इन्क्रीमेंट वाढ झालेली नाही. दोन वर्षे कोणत्याही प्रकारचा बोनस देण्यात आलेला नाही.

यासह कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह खात्यात निधी देखील भरलेला नाही. सिटीलिंक प्रशासन व ठेकेदार संगनमताने कर्मचारी वर्गाची दिशाभूल करीत आहेत, असे देखील आंदोलनकर्ते वाहकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash Video: नवीन चलनी नोटांनी भरलेले वायुसेनेचं विमान रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा मृत्यू, ३० जखमी, पण लोकांना दिसल्या फक्त नोटा

अग्रलेख : सत्तेची ‘नशा’ उतरवली

Panchang 28 February 2026: आजच्या दिवशी हनुमान चालीसा स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

T20 WC, Semi Final Fixture : इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचला, पण कोणाला भिडणार? वानखेडे स्टेडियमवर कल्ला होणार... जाणून घ्या समीकरण

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २८ फेब्रुवारी २०२६ ते ६ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT