Nashik Citylinc Bus Strike
Nashik Citylinc Bus Strike esakal
नाशिक

Nashik Citylinc Bus : अडीचशे बसच्या फेऱ्या कमी होणार; दररोज 4 लाखाचा फटका

सकाळ वृत्तसेवा

Nashik Citylinc Bus : महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोट्यात गेल्याने अखेर यू- टर्न घेत सिटीलिंकच्या २५० बस फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दररोज सरासरी चार लाख रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे, तर जवळपास २० हजार प्रवासी कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ८ जुलै २०२१ पासून शहर बससेवा सुरू करण्यात आली. ( Citylinc Two hundred bus trips will be reduced )

बसचे संचलन ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट या पद्धतीने केले जात आहे. सद्यःस्थितीत ६४ मार्गावर २४० बस सुरू आहे. या बसला ८५ रुपये प्रतिकिलोमीटर याप्रमाणे प्रत्येकी २०० किलोमीटरचे पैसे अदा करावे लागतात. सुरवातीच्या काळात बससेवा चांगली सुरू होती. प्रवाशांकडूनदेखील जोरदार स्वागत झाले. परंतु तब्बल नऊ वेळा बस वाहकांचा संप झाल्याने सिटीलिंक बससेवेवरील प्रवाशांचा विश्वास उडत चालला आहे.

त्यात आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शैक्षणिक संस्था बंद असल्याने बससेवा आणखी तोट्यात आली आहे. मागील दोन वर्षात सरासरी ४५ ते ५० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यामुळे विद्यार्थी संख्या घटल्याने पंधरा ते वीस हजार प्रवासी संख्या घटली. परिणामी दररोज चार लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. (latest marathi news)

त्यामुळे कमी प्रवासी संख्या असलेल्या मार्गावर अडीचशे फेऱ्या कमी करण्याचा निर्णय सिटीलिंक कंपनी प्रशासनाने घेतला आहे. ६३ मार्गावर २७०० बस फेऱ्या होतात. यातून जवळपास २५ लाख रुपये महसूल प्राप्त होतो. परंतु शाळा व महाविद्यालयांना सुट्टी लागल्याने उत्पन्न घटले आहे. दररोज सरासरी चार लाख रुपयांचा तोटा आहे. सुट्ट्यांमुळे पासधारक विद्यार्थ्यांची संख्या घटली. या सर्वांचा एकत्रित परिणाम महसूल कमी होण्यात झाला आहे.

पाय आणखी खोलात

सिटीलिंक कंपनीमार्फत ई -बस खरेदी केल्या जाणार आहे. परंतु सद्यःस्थितीत सुरू असलेल्या बस तोट्यात चालत असल्याने फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला जात आहे. अशा परिस्थितीत ई-बसचा तोटादेखील सहन करावा लागणार असल्याने सिटीलिंक कंपनीचा पाय अधिक खोलात जात असल्याचे दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT