Encroachment of concrete construction going on in school grounds in Chehedi area.  esakal
नाशिक

Nashik News : जिल्हाधिकारी कार्यालयाचे मनपाच्या जागेवर अतिक्रमण! परवानगी न घेताच तलाठी कार्यालयाचे बांधकाम

Nashik News : खासगी जागा असो वा सरकारी त्या ठिकाणी बांधकाम करायचे असेल तर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आवश्यक आहे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : खासगी जागा असो वा सरकारी त्या ठिकाणी बांधकाम करायचे असेल तर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आवश्यक आहे. मात्र कुठलीही परवानगी न घेता बांधकाम करण्याचा प्रकार चेहेडी भागात समोर आला आहे. महापालिकेच्या शाळेच्या जागेवर तलाठी कार्यालय कोणाचेही परवानगी न घेता बांधले जात असल्याने यासंदर्भात शिक्षण विभागाने महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे तक्रार केली. (Nashik Collector office encroachment on municipal space news)

खासगी जागेवर बांधकाम करण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये नियम आहे. ज्या जागेवर बांधकाम करायचे आहे ती जागा बिनशेती हवी त्याचबरोबर त्या जागेचा रीतसर लेआउट पडणे गरजेचे आहे. लेआउट पडल्यानंतर बांधकाम करण्यासाठी नगरपालिका किंवा महापालिकेच्या नगररचना विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक असते.

सरकारी कामासाठी बांधकाम करायचे असले तरी त्यासाठी कागदपत्रांचा उपचार पार पाडावा लागतो. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेच्या जागेवर स्वतःचीच मक्तेदारी असल्याचे समजून बांधकाम सुरू केले. चेहेडी येथील शाळा क्रमांक 53 मध्ये परवानगी न घेता तलाठी कार्यालयाचे बांधकाम हाती घेण्यात आले.

बांधकाम बऱ्यापैकी जमिनीच्या वर आल्यानंतर मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांनी या संदर्भात ठेकेदाराकडे विचारणा केली. सदर जागा सरकारी असल्याने यावर कुठल्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे उत्तर देण्यात आले. तलाठी कार्यालयासाठी नाशिक उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आल्याचे थातूरमातूर उत्तर देण्यात आले.  (latest marathi news)

सदर कामाबद्दल संशय आल्याने शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांनी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी बी. टी. पाटील यांच्याकडे तक्रार केली. श्री. पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला. दरम्यान, आपल्या भागात तलाठी कार्यालय असावे या हेतूने एका माजी नगरसेवकाने पुढाकार घेताना तलाठी कार्यालयाला विरोध करू नका यासाठी तक्रारदारांवर दबाव आणला.

"ज्या जागेवर बांधकाम केले जात आहे, ती जागा क्रीडांगणासाठी आहे. तलाठी कार्यालयासाठी बांधकाम सुरू केल्याने या संदर्भात तक्रार करण्यात आली आहे."

- बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT