Officers and Newspaper Vendors of Nashik Road Newspaper Vendors Benevolent Organization while giving a statement to Municipal Commissioner Dr. Ashok Karanjkar regarding obtaining permanent license for newspaper vendors' stalls in municipal area. esakal
नाशिक

Nashik News : वृत्तपत्र विक्रेत्यांना मिळणार हक्काची जागा : आयुक्त डॉ. करंजकर

Nashik : मुंबई व ठाणे महापालिकेकडून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलला कायमस्वरूपी परवाना देण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मुंबई व ठाणे महापालिकेकडून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलला कायमस्वरूपी परवाना देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेतील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉललादेखील कायमस्वरूपी परवाना द्यावा, अशी मागणी नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेतर्फे महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे करण्यात आली. आयुक्तांनी तातडीने दखल घेत जाहिरात व परवाना विभागाला या संदर्भात अभ्यास करून धोरण ठरविण्याच्या सूचना दिल्या. (nashik Commissioner Dr Karanjkar statement of Newspaper vendors marathi news )

शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृत्तपत्र विक्रेते आहे. मुख्यत्वे पहाटे शहरात विविध ठिकाणी स्टॉल लावले जातात. महापालिका क्षेत्रात वृत्तपत्र विक्रेत्यांचे पहाटेपासून साधारण दुपार चारपर्यंत वृत्तपत्र व मासिकांची विक्री होत असते. वृत्तपत्र विक्रेत्यांची वृत्तपत्र विक्री करण्याची वेळ साधारण सकाळी असते. या दरम्यान वाहतुकीला किंवा सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण होत नाही.  (latest marathi news)

त्यामुळे अतिक्रमण विभागाकडून कारवाई होऊ नये, अशी अपेक्षा या वेळी आयुक्तांच्या भेटीत व्यक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे मुंबई व ठाणे महापालिकेने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलला परवाना दिला आहे. त्याच धर्तीवर नाशिक महापालिका हद्दीमध्येदेखील धोरण निश्‍चित करावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना यासाठी परवाना शुल्क भरण्याची तयारी वृत्तपत्र विक्रेत्यांनी दाखविली.

आयुक्तांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेत कर उपायुक्त श्रीकांत पवार यांना या संदर्भात धोरण तयार करून महासभेवर ठेवण्याच्या सूचना दिल्या. या वेळी नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, उपाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष जितेंद्र भोसले, कार्याध्यक्ष उल्हास कुलथे, सचिव गौतम सोनवणे, खजिनदार योगेश भट, भारत माळवे, सदस्य संजय चव्हाण, रवी सोनवणे, हर्षल ठोसर, संपत निरभवणे, मधुकर सोनार, बंटी भालेराव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT