nmc esakal
नाशिक

Nashik News : उत्पन्नवाढीसाठी नवीन जागांचा शोध; आयुक्तांची माहिती

Nashik : महापालिकेकडून उत्पन्नवाढीसाठी नवीन जागा शोधून तेथे होर्डिंग उभारल्या जाणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या जाहिरात होर्डिंगमधील अनियमितता समोर आल्यानंतर यापूर्वी निविदा काढलेल्या २८ जागा व्यतिरिक्तदेखील महापालिकेकडून उत्पन्नवाढीसाठी नवीन जागा शोधून तेथे होर्डिंग उभारल्या जाणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिली. जाहिरात व परवाने विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधींचा होर्डिंग घोटाळा झाल्याचा आरोप नाशिक आउटडोअर ऍडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने केला होता. ()

होर्डिंगचे काम देताना विशिष्ट मक्तेदारांना डोळ्यासमोर ठेवून निविदेत अटी व शर्तीचे उल्लंघन करण्यात आले. यातून महापालिकेचा मोठ्या प्रमाणात कर बुडाल्याचा आरोप करण्यात आला. आरोपांच्या पार्श्वभूमीवर आयुक्त करंजकर यांनी चौकशी समिती गठित केली. १६ डिसेंबर २०२१ ला महापालिकेकडून खुल्या जागेवर होर्डिंग लावण्यासाठी निविदा काढण्यात आली.

त्यात महापालिका हद्दीतील २८ खुल्या जागांवर जाहिरात फलक उभारण्यासाठी दर मागविले. मात्र मक्तेदाराला कार्यारंभ आदेश देताना अटी- शर्तीचे उल्लंघन करण्यात आले. खुल्या जागा, रस्ते, वाहतूक बेटे, दुभाजक, इमारती, उद्याने, वापरात असलेल्या व वापरात नसलेल्या जागा, बांधीव मिळकतींवर जाहिरात फलक उभा नाही अशा ठिकाणी परवानगी दिली गेली. (latest marathi news)

निविदेत फक्त जाहिरात फलक असा उल्लेख करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात जाहिरात फलकांसोबत प्रकाशित फलक, युनिफोल, एलईडी वॉल या सर्वांना परवानगी दिली व एकच दर लावले गेले. यातून महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला होता. महापालिकेच्या जाहिरात व परवाना विभागात २८ ठिकाणी जाहिरात फलक उभारल्याची नोंद असताना, शहरात साठहून अधिक जाहिरात फलक उभारण्याचा आरोप केला होता.

यासाठी चौकशी समिती गठित करण्यात आली होती. समितीने महापालिका आयुक्तांकडे अहवाल सादर केल्यानंतर निविदा प्रक्रियेत नमूद केलेल्या २८ व्यतिरिक्त अन्य नवीन जागा शोधून जाहिरात होर्डिंग लावले जाणार आहेत. यातून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

यापूर्वी २८ जागांच्या निविदा

जाहिरात होर्डिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र, नाशिकमध्ये होर्डिंग माध्यमातून हव्या त्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होत नाही. त्यामुळे यापूर्वी २८ जागांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्या व्यतिरिक्त नवीन जागा शोधून त्या जागांवर जाहिरात होर्डिंग लावण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. या माध्यमातून उत्पन्नात वाढ होईल, असा दावा आयुक्तांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT