Nashik Police Commissioner Office esakal
नाशिक

Nashik News : आयुक्तालयातील प्रभारींवर ‘खांदेपालटा’ची टांगती तलवार; सहायक आयुक्तांमध्ये फेरबदलाची चर्चा

Nashik News : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील काही पोलिस ठाण्यांच्या प्रभारींविरोधात थेट आयुक्तांकडेच तक्रारी आल्याचे समजते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील काही पोलिस ठाण्यांच्या प्रभारींविरोधात थेट आयुक्तांकडेच तक्रारी आल्याचे समजते. त्यामुळे अनेक प्रभारी पोलिस निरीक्षकांचे धाबे दणाणले असून, नेमकी कोणाच्या डोक्यावर टांगती तलवार, याची मात्र पोलिस आयुक्तालयात रंगतदार चर्चा सुरू आहे. (complaints against in charge of some police stations within city police commissionerate limits)

दरम्यान, आयुक्तालयातील दोन सहायक आयुक्तांच्या बदल्या झाल्याने तीन नवीन सहायक आयुक्तांपैकी संगीता निकम या आयुक्तालयात हजर झाल्या आहेत. यामुळे सहायक आयुक्तांमध्येही खांदेपालट होण्याची चर्चा आयुक्तालयात आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गेल्याच आठवड्यात झाले.

त्यानुसार, मीरा-भायंदर-वसई-विरारच्या सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे-चव्हाण, सोलापूर प्रशिक्षण केंद्रातील उपअधीक्षक अनुराधा उदमले, महाराष्ट्र पोलिस अकादमीतील संगीता निकम यांची नाशिक शहर आयुक्तालयात बदली झाली आहे. संगीता निकम या आयुक्तालयात हजर झाल्या आहेत. पद्मजा बढे आणि अनुराधा उदमले यांना अद्याप त्यांच्या मूळ मुख्यालयातून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. (latest marathi news)

त्यामुळे त्या हजर झाल्यावरच आयुक्त संदीप कर्णिक हे कोणाकडे काय जबाबदारी देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सरकारवाडा विभागाचे सहायक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांचीही अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथे तर, आस्थापनाचे अंबादास भुसारे यांची हिंगोली उपविभागीय अधिकारी पदी बदली झाली आहे.

‘प्रभारीं’मध्ये फेरबदलाची चर्चा

गेल्या काही दिवसांमध्ये आयुक्तालय हद्दीतील काही पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या तक्रारी थेट आयुक्तांपर्यंत पोहोचल्या आहेत. यावरून आयुक्तांकडून फेरबदलाचे संकेत देण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. नवीन बदल्यांमध्ये परजिल्ह्यातून नाशिकला बदली होऊन अनेक अधिकारी रुजू होत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांचीही वर्णी लागू शकते. परिणामी, सध्या नियुक्त प्रभारींच्या जबाबदारीत विशेष बदल होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT