Regarding the problems in the city, Commissioner Dr. While presenting complaints to Ashok Karanjkar, MLA Adv. Rahul hesitated esakal
नाशिक

Nashik News : पाणी टंचाई ते शवदाहिनीच्या तक्रारी; आमदारांकडून पुन्हा आयुक्तांची झाडाझडती

Latest Nashik News : आमदारांनी शुक्रवारी (ता.५) पुन्हा पाणी टंचाईसह विविध समस्यांवर पुन्हा आयुक्तांना घेरले. आयुक्तांनी तातडीने समस्यांची निराकरण करण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील समस्यांवरून ऑगस्ट महिन्यात आयुक्तांना धारेवर धरणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी शुक्रवारी (ता.५) पुन्हा पाणी टंचाईसह विविध समस्यांवर पुन्हा आयुक्तांना घेरले. आयुक्तांनी तातडीने समस्यांची निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. (Complaints from water scarcity to cremation)

शहराला पाणीपुरवठा करणारे धरणे काठोकाठ भरले असताना पाणीपुरवठ्यात असमतोल आहे, काही ठिकाणी पाणी येते मात्र पाण्याबरोबर गाळ वाहून येतो. अनेक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक कारणे दिली जातात व त्यातून पैशांचीही मागणी केली जाते.

पंचवटी विभागात अनेक दिवसांपासून बंद असलेली शवदाहिनी सुरू करण्यासाठी आमदार निधीतून वित्त पुरवठा केला. मात्र यांत्रिकी विभागाने मोटार दुरुस्ती केली नाही, अशा एक ना अनेक तक्रारी आज भारतीय जनता पक्षाच्या आमदारांसह लोकप्रतिनिधींनी केली.

आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना त्रासातून मुक्त करण्याची मागणी केली सिडको विभागात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे मागणे आमदार सीमा हिरे यांनी केली. भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, माजी उपमहापौर गुरमित बग्गा, हेमंत शेट्टी, प्रतिभा पवार, रश्मी हिरे, खंडू बोडके आदी यावेळी उपस्थित होते. (latest marathi news)

धम्म मेळाव्यास सुविधांची मागणी

विजयादशमीच्या दिवशी त्रिरश्मी लेणी येथे धम्म मेळावा आयोजित केला जातो. यंदा मोठ्या स्वरूपात मेळावा होणार असून त्यासाठी सुविधा पुरविण्याची मागणी भंते यांनी केली. मागील वर्षी श्रीलंका येथून आणलेल्या बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण येथे केले आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात उत्सव होणार आहे. त्यासाठी सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आली. आयुक्त करंजकर यांनी तातडीने सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT