Proceedings of the Conciliation in the Lok Adalat. esakal
नाशिक

National Lok Adalat : फिरत्या लोकअदालतीत 36 प्रकरणांत तडजोड; राष्ट्रीय लोकअदालत 27 जुलैला होणार

Nashik News : जलद न्यायदानासाठी २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने आयोजित फिरत्या लोकअदालतीच्या माध्यमातून विमा कंपन्यांनी प्रलंबित ८१ पैकी एकूण ३६ प्रकरणात तडजोड करून जखमी झालेल्या पक्षकारांना व मृतांच्या वारसांना एक कोटी ९५ लाख ६९ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. (Compromise in 36 cases in rotating National Lok Adalat)

तसेच जलद न्यायदानासाठी २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर यांनी दिली. उच्च न्यायालय, विधी सेवा समिती, मुंबई यांच्या आदेशान्वये व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली या फिरत्या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. (latest marathi news)

पॅनलप्रमुख म्हणून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश डी. डी. देशमुख व पॅनल सदस्य म्हणून ॲड. प्रशांत जोशी यांनी काम पाहिले. लोकअदालतीच्या आयोजनातून सर्वसामान्य पक्षकारांना तत्काळ न्याय मिळून प्रकरणे निकाली निघाल्याने पैसा व वेळेची बचत होते.

त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी २७ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT