डांगसौंदाणे येथे संथपणे सुरु असलेल्या कॉंक्रीटकरण कामामुळे विस्कळीत झालेली वाहतूक.  esakal
नाशिक

Nashik News : डांगसौंदाणेतील रस्ता काँक्रिटीकरणाला गती मिळेना! 2 महिन्यांपासून वाहतूक बंद

Nashik News : डांगसौंदाणे येथील शिवतीर्थ ते संभाजी चौकापर्यंत एक किलोमीटर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम दोन महिन्यांपासून संथ गतीने सुरु आहे.

सकाळ वृत्तसेवा

डांगसौंदाणे : येथील शिवतीर्थ ते संभाजी चौकापर्यंत एक किलोमीटर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम दोन महिन्यांपासून संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, ३८ गावांची बाजारपेठ प्रभावीत झाली आहे. रस्ता कामाला गती देण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. (Nashik concreting of road in Dangsaundane not speeding upmarathi news)

कॉंक्रीटीकरणासाठी दोन ते तीन फूट रस्ता खोदण्यात आला आहे. जवळपास दीड महिन्यापासून पुढील कामाला सुरुवात झालेली नाही. खोदकाम केलेल्या रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे. ठिकठिकाणी खडी, मुरूम, वाळूचे मोठमोठे ढिग पडले आहेत.

हा रस्ता जिल्हा परिषद शाळा, जनता विद्यालय व महाविद्यालयाजवळून गेला आहे. मुख्य बाजारपेठ व रहदारीचा रस्ता असल्यामुळे विद्यार्थी, महिला, वृद्धांना त्रास सहन करावा लागतो. वेळोवेळी विद्यार्थी, वृद्ध रस्त्यावर पडून दुखापत होते. रस्ता मुख्य बाजारपेठेचा असल्याने नेहमीच वर्दळ असते.

बसस्थानक जवळच असल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बससह इतर वाहनांसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना बस पकडण्यासाठी पायी जावे लागते. खोदलेल्या रस्त्यांमुळे एसटी गाड्या व इतर वाहनांना सुद्धा रहदारीस बंद झालेला आहे .त्यामुळे बस गाड्या बस स्टॉप वर येत नाहीत. (Latest Marathi News)

अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा

रस्ता लवकर व दर्जेदार करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांच्याकडून वेळकाढूपणाचे उत्तर मिळत आहे. परिसरातील नागरिकांनी कामाचा दर्जा नित्कृष्ट असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. काम चांगल्या दर्जाचे व लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.

"जवळपास दोन महिन्यांपासून रस्ता कामाला सुरुवात झाली आहे. रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, ग्राहक येत नसल्याने व्यापार मंदावला आहे. रस्त्याचे काम त्वरीत करावे."- किशोर चिंचोरे, किराणा व्यापारी, डांगसौंदाणे

"रस्ता कामामुळे व खोदकामामुळे विद्यार्थी व वृद्धांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने सुरु करून गैरसोय टाळावी. रस्ता काम निविदेप्रमाणे करावे."

- निवृत्ती सोनवणे, ग्रामस्थ, डांगसौंदाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT