Dindori Zilla Parishad School No Three adjacent to Nilwandi Road. esakal
नाशिक

Nashik News : दिंडोरीतील पश्‍चिम पट्ट्यातील शाळांची अवस्था दयनीय

Nashik News : ज्या गावात शाळा चांगली त्याच गावाची प्रगती झालेली आपल्याला दिसून येते, मात्र आजही दिंडोरी पश्चिम पट्ट्यातील शाळांची अवस्था काही प्रमाणात बिकट आहे.

रामदास कदम

दिंडोरी : चालू शैक्षणिक वर्षासाठी राज्य सरकारने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णय हा अतिशय सकारात्मक आहे.कारण शाळा म्हणजे एक ज्ञान मंदिर आहे.ज्या गावात शाळा चांगली त्याच गावाची प्रगती झालेली आपल्याला दिसून येते, मात्र आजही पश्चिम पट्ट्यातील शाळांची अवस्था काही प्रमाणात बिकट आहे. (condition of schools in western belt of Dindori is pathetic)

सध्या पावसाळा जवळ येत असल्याने गळकी शाळा दुरुस्ती कामे सुरू आहेत. बहुसंख्य शाळा ग्रामनिधीतून नव्याने बांधण्यात आलेल्या आहेत. दिंडोरी तालुक्यात जिल्हा परिषद शाळा २१२, खासगी अनुदानित शाळा १४, शासकीय आश्रमशाळा ९, खाजगी अनुदानित शाळा ५९, खासगी विनाअनुदानित शाळा १४, खासगी अनुदानित २६, तालुक्यातील एकूण शिक्षक संख्या २४४१ आहे.

ग्रामीण भागात आजही विद्यार्थ्यांअभावी एक शिक्षिका शाळा दिसून येत आहे. यामुळे पहिली व पाचवीच्या वर्गांची संख्या घटत असल्याने तुकडी कमी झाली की शिक्षक कमी होत आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थी शोध मोहीम शाळांनी हाती घेतली आहे.

त्यात नव्याने शिक्षक भरती प्रक्रिया होत नसल्याने एका शिक्षकावर दोन वर्गांची जबाबदारी आहे. चालु वर्षांपासून मुलांचे पहिल्या दिवशी गेटजवळ उभे राहून गुलाब पुष्प देऊन तसेच जमल्यास खाऊ देऊन स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. (latest marathi news)

"सध्या ज्या शाळा गळत आहेत त्यांची दुरुस्ती कामे प्रगतीपथावर आहेत.तर काही दुरुस्त्या करून घेण्याच्या मार्गावर आहेत. दिंडोरी गटशिक्षणाधिकारी -नम्रता जगताप सकाळ शी बोलताना म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते आहे.शाळांचा लुक ही बदलला आहे.इंग्रजी माध्यमाजी मुलेही आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत." - नम्रता जगताप, गटशिक्षणाधिकारी, दिंडोरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill : पाकड्यांचे किडे वळवळले...! शुभमन गिलसोबत हात मिळवला अन् नंतर 'पाकिस्तान जिंदाबाद'चा नारा दिला, कॅप्टनने काय केले ते पाहा? Video

Uma Bharti Update News : उमा भारतींनी केली मोठी घोषणा! म्हणाल्या, 2029ची लोकसभा...

Amrit Bharat Express explosion : ‘अमृत भारत एक्सप्रेस’मध्ये स्फोट; प्रवासी ट्रेनमधून उतरले अन् रूळांवर धावू लागले

Madhuri Elephant Case : माधुरी हत्ती प्रकरण; हायपॉवर कमिटीचे नांदणी मठ व वनताराला संयुक्त निर्देश

Sakoli News : लक्ष्मीपूजनासाठी कमळाची फुले काढायला गेलेल्या साकोलीतील १९ वर्षीय युवकाचा तलावात बुडून दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT