Congress flag esakal
नाशिक

Nashik Congress News : काँग्रेसच्या प्रचाराचा आज फुटणार नारळ! इगतपुरीत आदिवासी मेळावा; प्रभारी रमेश चेन्निथला यांची उपस्थिती

Latest Political News : काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह प्रमुख नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Congress News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीद्वारे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीतील वाडीवऱ्हे येथे मंगळवारी (ता. १५) आदिवासी संवाद मेळावा होणार आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह प्रमुख नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाण्याची शक्यता आहे. (Congress campaign will start today)

महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात शहरातील काँग्रेस कार्यालयात जिल्हाभरातील १५ मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. हिरामण खोसकर इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून, त्यांच्यासह १३ इच्छुक मुलाखत प्रक्रियेला सामोरे गेले.

खोसकरांना उमेदवारी देण्याबाबत पक्षांतर्गत दोन मतप्रवाह आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात इगतपुरीची जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर याच मतदारसंघात पक्षाने आदिवासी संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळावा सकाळी अकराला वाडीवऱ्हे येथील इंदू लॉन्सवर होईल. (latest marathi news)

मेळाव्यास प्रभारी चिन्नथला, आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, प्रदेशाध्यक्ष पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री के. सी. पाडवी, कार्याध्यक्ष कुणाल पाटील आदी उपस्थितीत राहून मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, मेळाव्यात शहरासह जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांचे प्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Naik: अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा, गणेश नाईक यांचे आदेश

यंदाच्या विसर्जन मिरवणुका होणार डीजेमुक्त! पोलिस आयुक्त कारवाईबाबत सक्त, ‘डीजे’वाले वरमले; डीजेविरोधातील असंतोषाला वाट, दर तासाला ३०० सोलापूरकरांचे मिस कॉल

Narendra Modi: ''भारत-चीनने एकत्र येणं गरजेचं'', जपानमधून मोदींचा ट्रम्प यांना थेट मेसेज

Maratha Morcha : मुंबईतील मराठा मोर्चात ‘मुस्लिम मावळा’चे बॅनर झळकले

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

SCROLL FOR NEXT