Corona Updates  google
नाशिक

नाशिक जिल्ह्यात आज 118 रुग्णांची कोरोनावर मात

अरुण मलानी

नाशिक : कोरोनाची दुसरी लाट ओसरताना जून महिन्‍यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या घटली. परंतु अद्याप कोरोनामुळे होणारे मृत्‍यू चिंतेचा विषय आहे. बुधवारी (ता. ३०) जिल्ह्यात सहा बाधितांचा कोरोनाने बळी गेला. दिवसभरात १३२ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर ११८ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. दोन हजार ४७३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. (132 new coron patients reported in nashik district)


बुधवारी (ता. ३०) नाशिक महापालिका क्षेत्रात चार, नाशिक ग्रामीण व मालेगाव महापालिका क्षेत्रात प्रत्‍येकी एका बाधिताचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. शहरात जुने नाशिक परिसरातील चवाटा येथील ७० वर्षीय महिला, गंजमाळ परिसरात ७२ वर्षीय पुरुष, अंबड परिसरातील ८१ वर्षीय आणि ४६ वर्षीय पुरुष बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. ग्रामीण क्षेत्रात मालेगाव तालुक्‍यातील दाभाडीत ५१ वर्षीय पुरुष, मालेगाव महापालिका क्षेत्रात कॅम्‍प भागात ४४ वर्षीय महिलेचा मृत्‍यू झाला आहे.


नाशिक महापालिका क्षेत्रात ७८, नाशिक ग्रामीणमध्ये ५१, मालेगाव महापालिका क्षेत्रात एक, तर जिल्‍हाबाहेरील दोन रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ६६४ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील ७५४, मालेगावचे ७३३, नाशिक शहरातील १७७ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये, गृहविलगीकरणात ७३४ रुग्‍ण दाखल झाले. नाशिक महापालिका क्षेत्रातील ६६९ रुग्‍णांचा यात समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात आठ रुग्‍ण दाखल झाले.

(132 new coron patients reported in nashik district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल!

SCROLL FOR NEXT