corona updates Google
नाशिक

नाशिककरांना दिलासा! वर्षभरानंतर आढळले पन्नासपेक्षा कमी बाधित

अरुण मलानी

नाशिक : कोरोना महामारी प्रादुर्भावाच्‍या दृष्टीने जुलै महिना जिल्हावासियांसाठी दिलासादायक ठरत आहे. शुक्रवारी (ता.२३) जिल्‍ह्‍यात अवघ्या ४९ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तब्‍बल वर्षभराहून अधिक कालावधीनंतर दर दिवशी आढळलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या पन्नासपेक्षा कमी राहिली. दुसरीकडे १०८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली तर तीन बाधितांचा मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत ६२ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात एक हजार ३६६ बाधितांवर उपचार सुरु आहेत. (only 49 corona positive patients reported in district)

पहिल्या व दुसऱ्या लाटेत दैनंदिन आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या हजारांमध्ये राहिली. जिल्‍ह्‍यात कोरोनाचा पहिला बाधित २९ मार्चला आढळल्‍यानंतर शुक्रवारी नाशिक महापालिका क्षेत्रात वीस बाधितांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. नाशिक ग्रामीणमध्ये २६, मालेगाव महापालिका क्षेत्रात एक, जिल्‍हा बाहेरील दोघा रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली आहे.

प्रलंबित अहवालांचे वाढले प्रमाण

प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीय असून, सायंकाळी उशीरापर्यंत जिल्‍ह्‍यात एक हजार ८८४ अहवाल प्रलंबित होते. नाशिक ग्रामीण क्षेत्रातील सर्वाधिक एक हजार २६२, नाशिक महापालिका क्षेत्रातील ४०८, मालेगाव महापालिका क्षेत्रातील २१४ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४२० रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ३७९ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये २९ तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील दहा रुग्‍णांचा समावेश होता.

(only 49 corona positive patients reported in district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT