Nashik Corona Update esakal
नाशिक

Nashik Corona Update: शहरात नव्या व्हेरिएंटचा प्रसार! 18 बाधित; वैद्यकीय यंत्रणा अलर्टवर

नाशिक जिल्ह्यात सिन्नर, त्र्यंबकेश्वर मध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मागील आठ दिवसांत शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अठरा जणांना बाधित केले आहे.

त्यामुळे वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आली असून, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन अॅन्टिजेन तपासण्या केल्या जात आहेत. (Nashik Corona Update Spread of new variants in city 18 affected Medical system on alert)

नाशिक जिल्ह्यात सिन्नर, त्र्यंबकेश्वर मध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर टास्क फोर्स स्थापन करण्यात आल्यानंतर दोनच दिवसांत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट झाले.

यापूर्वी कोरोनाचे तीन रुग्ण होते. महात्मानगरमधील ३२ वर्षीय महिलेला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली. उर्वरित रुग्णांवर घरीच उपचार सुरू होते.

कोरोनाची लक्षणे आढळलेल्यांपैकी एक हजार ५०६ जणांच्या अॅन्टिजेन, तर १०३ जणांच्या आरटीपीसीआर एकूण एक हजार ६०९ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात १८ कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी सांगितले. एकीकडे कोरोनाने डोके वर काढले असताना डेंगीच्या साथीचा प्रादुर्भावही कायम असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या आठवडाभरात ३१ संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी ११ जणांना डेंगीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

यात नाशिक पूर्व, पंचवटी, नाशिक रोड विभागांतील प्रत्येकी दोन, सिडकोतील चार, तर सातपूर विभागातील एकाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: मुंबईत २९ दिवस ड्रोन आणि कंदील उडवण्यावर बंदी; दिवाळीपूर्वी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर!

Big Controvarsy: शुभमन गिलला कॅप्टन व्हायचं नव्हतं, रोहित शर्माकडून BCCI ने ते हिसकावून घेतले; अजित आगरकर व निवड समितीने प्रचंड दबाव आणला...

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

French PM Resigns: फ्रान्सची राजकीय अस्थिरता शिगेला! मंत्रिमंडळ नेमलं, पण पंतप्रधानांचा काही तासांत राजीनामा

Vijay Wadettiwar: ''काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर...'', जरांगेंना उत्तर देताना वडेट्टीवारांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT