corona sakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या पुन्‍हा हजाराच्‍या उंबरठ्यावर

अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यात उपचार घेणाऱ्या सक्रिय कोरोनाबाधितांच्‍या संख्येत पुन्‍हा वाढ होऊ लागली आहे. नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या तुलनेत कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या कमी राहात असल्‍याने ही वाढ होत आहे. शुक्रवारी (ता. १७) जिल्‍ह्यात ९४ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर ६४ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. एका बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. जिल्‍ह्यातील ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या पुन्‍हा एक हजाराच्‍या उंबरठ्यावर येऊन पोचली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात ९८० बाधितांवर उपचार सुरू आहेत.


शुक्रवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील २७, तर नाशिक ग्रामीणमधील ६३ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली. बऱ्याच दिवसांनंतर मालेगाव महापालिका क्षेत्रात दोघा रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. जिल्‍हाबाहेरील दोघांना कोरोनाची लागण झाली. दरम्‍यान, जिल्‍ह्यात दिवसभरात एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद असून, हा मृत नाशिक ग्रामीणमधील आहे.

सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ५९ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यापैकी नाशिक ग्रामीणमधील ५८२, नाशिक शहरातील २४२, तर मालेगावच्‍या २३५ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ७१९ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ६९३ रुग्‍णांचा समावेश होता. जिल्‍हा रुग्‍णालयात तीन, तर डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सहा रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील १५, तर मालेगावच्‍या दोघांचा यात समावेश होता. दरम्‍यान, जिल्‍ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या चार लाख सात हजार २०१ वर पोचली असून, यापैकी तीन लाख ९७ हजार ६१२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली आहे. आतापर्यंत आठ हजार ६०९ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT