Nashik Corporator sakal
नाशिक

नाशिक | सांगा नगरसेवकांनो, कोटींचा ‘विकासनिधी’ गेला कुणीकडे?

कॅलेंडर, माहिती पत्रकवाटपपेक्षा निधी खर्चाची होतेय मागणी

सकाळ वृत्तसेवा

सिडको : प्रभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी नाशिक महापालिकेतर्फे दर वर्षी घसघशीत नगरसेवक, प्रभाग व विशेष विकासनिधी दिला जातो. मात्र, तो नेमका कोठे व कशासाठी खर्च केला जातो, याचा थांगपत्ता शेवटपर्यंत नागरिकांना लागत नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता जनार्दन त्याचा हिशेब ‘डंके की चोट पर’ मागताना सध्या दिसत आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या विद्यमान नगरसेवक कॅलेंडर, माहितीपत्रकवाटप व घरोघरी भेटीगाठीवर जोर देत आहेत. हे करीत असताना, त्यांना दर वर्षी प्राधान्याने मिळणारा नगरसेवक, प्रभाग व विशेष विकासनिधी नेमका कोणत्या कामासाठी व कोठे खर्च केला, याची माहिती ‘डंके की चोट पर’ जाणकार नागरिक दारी आलेल्या नगरसेवकांना विचारत आहे. त्यावर बहुतांश नगरसेवकांची चांगलीच धांदल उडत आहे. दर वर्षी नगरसेवक निधी, प्रभाग विकासनिधी व विशेष निधी दिला जातो. असे कोट्यवधी रुपये प्रत्येक नगरसेवकाला मिळतात. त्यात ते रस्ते, ड्रेनेज, पाइपलाइन, बेंचेस, गार्डन, संगणक खरेदी, अभ्यासिका, योगावर्ग, रंगरंगोटी, गार्डनमधील खेळणी, ग्रीन जिम, वीजखांब, पेव्हर ब्लॉक, कॉन्सन्ट्रेटर अशा विविध विकासकामांचा समावेश करतात.

पहिल्या वर्षी ७५ लाख, त्यानंतर सलग चार वर्षे ४२ लाख, शेवटच्या वर्षी विशेष निधी सव्वाकोटी रुपये मिळाला. असा पाच वर्षांत अंदाजे ३६८ कोटी रुपये प्रत्येकी एका नगरसेवकाला मिळाला. अशा एकूण १२२ नगरसेवकांना जवळपास चार ते साडेचार कोटी रुपये मिळाले असावेत. त्यांनी नेमका हा खर्च कोठे व कशासाठी खर्च केला, याची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. त्याव्यतिरिक्त महासभेत विकासकामांसाठी विशेष निधी दिला जातो, तो वेगळाच!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

Scam Alert Kolhapur : गोलमाल है भाई गोलमाल है! एक गाव आणि चार भक्त निवास, आणखी दोन भक्त निवासासाठी ४० लाखांची मंजुरी

पुण्यातील ऐतिहासिक पर्वती टेकडीचे सौंदर्य धोक्यात? TDR वाटपाचा वाद पुन्हा पेटला; चतुःशृंगी-शनिवारवाड्याला वेगळा न्याय का?

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर, ४०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद

iPhone 17 आजपासून भारतात उपलब्ध, खरेदीसाठी स्टोअरबाहेर झुंबड; मध्यरात्रीपासून रांगेत, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT