A student risked her life while crossing the railway tracks due to water puddle under the narrow bridge. esakal
नाशिक

Nashik News : जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ कॉसींग! भुसावळ मंडळाच्या अभियांत्रिकी विभागाचे बेपर्वाईचे धोरण

Nashik News : रेल्वेच्या पुलाखाली पाणी साचल्याने विद्यार्थी आता जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : रेल्वेच्या अभियांत्रिकीत त्रुटी राहून गेल्या तर काय घडू शकते, याचा अनुभव सर्वदूर सारखाच असतो. थेट जनतेशी तसा संबंध येत नसल्याचा परिणाम रेल्वे यंत्रणेचा मुजोरपणा कमी होण्याऐवजी उलटपक्षी वाढतच असतो. असाच प्रकार येथे सुरु असून, रेल्वेच्या पुलाखाली पाणी साचल्याने विद्यार्थी आता जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडत आहे. (Cosing railway line at risk of life)

नदीपात्रातील पुलाखालून जाण्यास मनाई करणाऱ्या रेल्वेची तीच यंत्रणा मात्र थेट नदीपात्रातील पूररेषा नियंत्रण कायदा धाब्यावर बसवून जेथून मनाई केली त्याला खेटून सबवेचे आरेखन निश्‍चित करते व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परस्पर मंजुऱ्या मिळवून कामही पूर्ण करून घेतले जाते. याचा कटू अनुभव नांदगावकरांना सातत्याने येत असतो.

नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी याप्रश्‍नी रेल्वे बोर्डात नांदगावकरांचे गाऱ्हाणे पोहचवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वेच्या तिसऱ्या ट्रॅकचे काम सुरु करतांना जुना रस्ता त्या भूसंपादनात गेल्यामुळे आझादनगरच्या ग्रामस्थांना शहरात जाण्या-येण्यासाठी रस्ताच शिल्लक राहिला नसल्याने हा रस्ता मिळावा, रेल्वे ट्रॅकला समांतर रस्ता तयार करून मिळावा, यासाठी आझादनगर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा लढा गेल्या तीन वर्षांपासून सुरु आहे.

अगोदरच रेल्वे ट्रॅकमुळे शहराचे सरळ सरळ दोन भागात पूर्व-पश्‍चिम अशी विभागणी झाली आहे. रेल्वेने जुन्या पुलांचे नूतनीकरण करताना अभियांत्रिकी कौशल्य व त्याबाबतचे सर्वमान्य निकष बाजूला तयार करून पुलांचे अस्तरीकरण करताना अगोदरची अरुंद वाट अधिकच अरुंद केली. परिणामी, या पुलाचा वापर करता येत नाही. (latest marathi news)

पुलाखालून वापर होत नाही. रेल्वे रूळ जीव धोक्यात घालून ओलांडावे लागतात. कित्येकदा अपघात झाले आहेत. मात्र, संवेदनशून्य रेल्वे यंत्रणेला त्याच्याशी काही एक घेणेदेणे नसते. भुसावळ विभागातील मक्तेदारांची लॉबी हाताशी धरून पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यात धन्यता मानली जाते.

मोकळ्या रस्त्याचा अभाव

शहरालगत असलेल्या गारेवाडा, कूंध्रेवाडा, पिंजारवाडी, माणीकशेठ मिल, अब्दुल करीम चाळ, फुकटवाडी, चांडक प्लॉट आदी ठिकाणच्या भागांना रेल्वे पुलाखाली पावसाळ्यात सदैव पाणी भरलेले असते. या ठिकाणी जाण्यासाठी सुरक्षित, मोकळा रस्ता नसल्याने नागरीक व शालेय मुला-मुलींना लोहमार्गावरुन धोकादायक स्थितीत रेल्वे रूळ ओलांडल्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT