traffic esakal
नाशिक

NMC News : वाहतूक समस्या निवारणासाठी महापालिकेत ट्रॅफिक सेलची निर्मिती

NMC : शहराचा विस्तार वाढत असताना वाहतूक समस्याही जटिल बनली आहे.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : शहराचा विस्तार वाढत असताना वाहतूक समस्याही जटिल बनली आहे. शहरातील गावठाण भागात लोकसंख्या वाढण्याबरोबरच वाहनेदेखील वाढत आहेत, त्यामुळे मुख्य बाजारपेठेत वाहनांची गर्दी होऊन वाहतूक विस्कळित होण्याचे प्रकार घडतात. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. (nashik nmc Traffic Cell marathi news)

यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेत ट्रॅफिक सेलची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात महापालिकेला पत्र देखील पाठविले आहे. महापालिकेत ट्रॅफिक सेल निर्माण करण्याची आवश्यकता होती, त्या अनुषंगाने महासभेत वारंवार चर्चा झाली. परंतु शासनाकडून ठोस असा निर्णय होत नव्हता. मात्र दोन दिवसांपूर्वी ट्रॅफिक सेल निर्मितीची घोषणा करण्यात आली.

ट्रॅफिक सेलच्या माध्यमातून सर्वंकष वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करणे, वाहनतळांची निर्मिती करणे, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करणे, रस्त्यांवर सायकल ट्रॅकची निर्मिती करणे, फुटपाथ व झेब्रा क्रॉसिंगची निर्मिती करणे, सार्वजनिक वाहतूक करण्यासाठी डेपो टर्मिनल व शेल्टर उभारणे, पूल व बांधकामे उभारणे, ब्लॅक स्पॉटचे निर्मूलन करणे, गरजेच्यावेळी मार्गक्रमणामध्ये बदल करणे, सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे आदी प्रकारची कामे केली जाणार आहेत. (latest marathi news)

नाशिक महापालिकेत ट्रॅफिक सेलसाठी कनिष्ठ अभियंता व उपअभियंत्याची प्रत्येकी एकेक पद भरण्यास मान्यता दिली आहे. तसेच सहाय्यक अभियंता दोन व कनिष्ठ अभियंता चार पदांची निर्मितीही केली जाणार आहे.

ट्रॅफिक सेलसाठी लॉबिंग

ट्रॅफिक सेलचे नियोजन करण्यासाठी कार्यकारी अभियंता नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेत पद निर्मिती होताच लॉबिंग सुरू झाले आहे. उप अभियंता पदावर कार्यरत असलेल्या काही अभियंत्यांकडून कार्यकारी अभियंता पदासाठी फिल्डिंग लावली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये आला अमरावतीचा बिल्डर

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

SCROLL FOR NEXT