Burglars Arrested esakal
नाशिक

Nashik Crime News : पाथरे येथील घरफोडीतील 14 लाख रोकड हस्तगत; महिलेसह 6 जणांना येवल्यातून पकडले

Crime News : गेल्या आठवड्यात 31 मार्चच्या दिवशी सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारात बंद असलेल्या घराचे दरवाजे तोडून भर दिवसा धाडसी घरफोडी करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

वावी : गेल्या आठवड्यात 31 मार्चच्या दिवशी सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारात बंद असलेल्या घराचे दरवाजे तोडून भर दिवसा धाडसी घरफोडी करण्यात आली होती. सोन्याच्या दागिन्यांसह घरातील कपाटात असणारी लाखो रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली होती.

या घटनेचा तपास करताना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने महिलेसह सहा जणांना येवल्यातून पकडले. त्यांच्याकडून सुमारे १४ लाखांची रोख रक्कम, सोन्याचे चोरलेले दागिने, गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार असा सुमारे २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. (Nashik Crime 14 lakh cash recovered from house burglary in Pathare news)

देवीची पूजा करण्याचा व्यवसाय असलेले मयुरेश निवृत्ती काळे यांच्या पाथरे शिवारात असलेल्या बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व एक ग्रॅम सोन्याचे पॉलिश असलेले दागिने चोरून नेले होते. काळे हे पूजेचे सामान आणण्यासाठी शिर्डीला गेले असताना हा प्रकार घडला होता.

वावी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर , निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश पालवे यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी तपासासाठी पथक तयार केले होते. या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व काळे यांच्याकडून माहिती घेतल्यावर बुधवारी सुनील शंकर म्हस्के (31) रा. साबरवाडी, चांगदेव भागीनाथ देवडे (35) रा. बदापुर, कैलास शिवाजी मढवई (34) रा. चिचोंडी, अकरम कमरूद्दीन शेख (31) रा. विंचुर रोड येवला, जीवन वाल्मीक कोल्हे (26) रा. हडप सावरगाव, अलका दीपक जेजुरकर (48) रा. येवला या संशयीतांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांना बोलते केल्यावर या गुन्ह्याच्या सर्व कड्या उकलण्यात पोलिसांना यश आले. वरील संशयितांकडून १४ लाख ७ हजार रुपये रोख रक्कम, सोन्याचे एक ग्रॅम पोलीशचे दागिने, गुन्ह्यात वापरलेल्या एच.एच.०४ / ई.टी. ७८९५ व एम. एच.१४ / क्यु.एक्स.४३९९ या दोन एर्टिगा कार गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केल्या. या सर्व संशयितांना व त्यांच्याकडून हस्तगत केलेला मुद्देमाल वावी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.  (latest marathi news)

गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे, उपनिरीक्षक दत्ता कांभीरे, नाना शिरोळे, पोलीस अंमलदार नवनाथ सानप, विश्वनाथ काकड, विनोद टिळे, मेघराज जाधव, उदय पाठक, संदिप नागपुरे, हेमंत गरूड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, गिरीष बागुल, विकी म्हसदे, महिला पोलीस अंमलदार योगिता काकड, छाया गायकवाड, अस्मिता मढवई यांनी या कारवाईत भाग घेतला.

गुन्ह्यात अटक केलेली महिला ही काळे यांना ओळखत होती. काळे यांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व दागिने असल्याचे तिला माहिती होते. घटनेच्या दिवशी संशयित सुनील म्हस्के व सदर महिला काळे यांच्यासोबत पूजेचे साहित्य घेण्यासाठी शिर्डी येथे गेली होती.

त्यानंतर इतर संशयीतांनी घराची टेहळणी करून दुपारच्या वेळी दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. घरातील कपाटात असलेली रोख रक्कम तसेच देवघरातील देवीच्या मूर्तीच्या अंगावर असलेल्या दागिन्यांची चोरी करून ते सर्वजण पसार झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT