Burglary Crime  esakal
नाशिक

Nashik Burglary Crime : 2 घरफोड्यात साडेसहा लाखांवर डल्ला : पोलिसांना आव्हान

Nashik Crime : शहर आयुक्तालय हद्दीमध्ये घरफोड्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. मंगळवारी दोन घरफोडीच्या घटना भरदिवसा घडल्या असून चोरट्यांनी ६ लाख ३८ हजारांचे दागिने व रोकडवर डल्ला मारला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Burglary Crime : शहर आयुक्तालय हद्दीमध्ये घरफोड्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. मंगळवारी (ता. ३०) दोन घरफोडीच्या घटना भरदिवसा घडल्या असून चोरट्यांनी ६ लाख ३८ हजारांचे दागिने व रोकडवर डल्ला मारला आहे. यामुळे पोलिसांसमोर घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. (Nashik Crime 2 house burglaries)

पंचवटीतील अमृतधाम येथे बंद फ्लॅटचे लॅचलॉक तोडून चोरट्यांनी १ लाख २३ हजारांचे दागिने व रोकड चोरून नेत घरफोडी केली. विजय भास्कर चौधरी (रा. सिद्धीविनायक ॲनॅक्स, वरद कॉलनी, अमृतधाम) यांच्या फिर्यादीनुसार, २९ तारखेला दुपारी दीड ते रात्री साडेअकरा या दरम्यान सदरची घरफोडी झाली.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घरफोडी आडगाव शिवारात झाली.

सुरेश देवराम धोंगडे (रा. महालक्ष्मीनगर, आडगाव शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, ३० तारखेला सकाळी साडेदहा ते दुपारी दोन यावेळेत त्यांच्या बंद कल्पतरु बंगल्याच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५ लाख १५ हजारांचे चांदीच्या कोईरी व रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलीसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT