Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: क्रेडिट कार्ड ॲक्टिव्ह करण्याच्या बहाण्याने तिघांना गंडा! सायबर भामट्यांनी लांबविले साडेआठ लाख रुपये

Cyber Crime : बँकेतून बोलत असल्याचे सांगत त्यांच्याकडून गोपनीय माहिती घेत तब्बल साडेआठ लाख रुपय त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन वर्ग करून घेत गंडा घातला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बॅकिंगच्या कामाकरिता कोणत्याही बँकेकडून खातेदारांना संपर्क साधला जात नाही. तसे संदेश बँकांकडून वारंवार खातेदारांच्या मोबाईलवर पाठविले जातात, असे असतानाही सायबर भामट्यांनी शहरातील तिघांना क्रेडिट कार्ड ॲक्टिव्ह करण्यासाठी बँकेतून बोलत असल्याचे सांगत त्यांच्याकडून गोपनीय माहिती घेत तब्बल साडेआठ लाख रुपय त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन वर्ग करून घेत गंडा घातला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik ​​cyber Crime 3 cheated on pretext of activating credit card marathi new)

बाळासाहेब सुखदेव जाधव (५७, रा. गुलमोहोर कॉलनी, आनंदननगर, मुक्तिधाम मागे, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्यासह शहरातील अन्य दोघांना सायबर भामट्याने आर्थिक गंडा घातला. जाधव हे त्यांच्या कामात व्यस्त असताना गेल्या जुलै २०२३ मध्ये त्यांना सायबर संशयितांनी आयसीआयसीआय आणि एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगत, ‘तुमचे क्रेडीट कार्ड सध्या डिअॅक्टिव्हेट आहे.

ते पुन्हा सुरु करण्यासाठी संपर्क साधल्याचे सांगितले. तसेच, क्रेडिट कार्ड सुरू केल्यानंतर बँकेकडून भविष्यात देण्यात येणाऱ्या फायदे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. सायबर भामट्यांच्या जाळ्यात तिघेही संशयित सापडले आणि त्यांनी त्यांचे बंद असलेले क्रेडिट कार्ड पुन्हा सुरू करण्यासाठी होकार दिला. (Latest Marathi News)

त्यानंतर सायबर भामट्यांनी तिघांनाही जुलै ते नोव्हेंबर २०२३ या दरम्यान वेगवेगळ्या कालावधीत मोबाईलवर संपर्क साधत त्यांना कार्ड सुरू करण्यासाठीची प्रक्रिया करण्यास भाग पाडले. त्यांनी त्यांच्याचकडून कार्डची गोपनीय माहितीसह आलेला ओटीपीही घेतला. त्यानंतर संशयित सायबर भामट्यांनी तिघांच्याही ओटीपी आणि सीव्हीव्ही नंबर मिळताच तिघांच्याही बँक खात्यातून ८ लाख ५२ हजार २६९ रुपये ऑनलाईन परस्पर काढून घेत दुसर्या बँकांमध्ये वर्ग केले.

"कोणत्याही बँकेकडून आपल्या ग्राहकांना संपर्क साधला जात नाही. त्यामुळे अशा फोनवर विश्वास ठेऊ नये. शंका असल्यास तत्काळ बँक वा सायबर पोलिसांकडे संपर्क साधावा. अनोळखी व्यक्तींला आपल्या बँकेसंदर्भातील कोणतीही गोपनीय माहिती देऊ नये. यामुळे फसवणूक होण्याची शक्यता बहुतांशी कमी होते."

- रियाज शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शहर सायबर पोलीस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : कल्ला होणार... CSK संजू, सर्फराज यांच्यासह ५ खेळाडूंना पदार्पणाची संधी देणार, आयपीएल गाजवणार

IDBI बँकेत १३०० पदांसाठी मोठी भरती; पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

SCROLL FOR NEXT