City Crime Branch Unit One team seized a stolen bike and laptop, mobile phone from the suspects. esakal
नाशिक

Nashik Crime News : 2 चोऱ्यांमधील 4 संशयित ताब्यात; युनिट 1 शाखेची कारवाई

Nashik Crime : युनिट १ शाखेच्या कारवाईत दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. चार संशयीतांना ताब्यात घेतले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : युनिट १ शाखेच्या कारवाईत दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. चार संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक दुचाकी, एक लॅपटॉप आणि एक मोबाईल असा सुमारे १ लाख ५ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. संशयीतांना पुढील तपासासाठी संबंधित पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. शहर गुन्हे शाखा युनिट १ पथकाचे पोलिस हवालदार विशाल काठे यांना दुचाकी चोराची माहिती मिळाली. ( 4 suspects in 2 robberies arrested by police )

शितळादेवी मंदिर परिसरात वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल, कर्मचारी विशाल काठे, नाझीम पठाण, प्रदीप म्हसदे, शरद सोनवणे यांनी सापळा लावला. सौरभ शिवाजी बनकर (रा.समता नगर), अजय कुंडलिक बोराडे (रा. गुरुप्रसाद सोसायटी, एन के नगर) दोघांना ताब्यात घेतले, त्यांची कसून चौकशी केली. त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली.

पथकाने त्यांच्याकडून एम एच १५, डी एफ ४३२९ दुचाकी जप्त केली. तर दुसऱ्या कारवाईत प्रशांत मरकड यांना मिळालेल्या माहितीनुसार आसाराम बापू पूल परिसरातून पोलिस कर्मचारी प्रवीण वाघमारे, संदीप भांड, धनंजय शिंदे, प्रशांत मरकड, अमोल कोष्टी, राम बर्डे यांनी शिताफीने संशयित आदित्य प्रकाश देवरे (रा. द्वारका), ऊर्जित कुंदन कुलकर्णी (रा. राणे नगर) दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्या चौकशीत त्यांच्याकडून एक लॅपटॉप आणि एक मोबाईल हस्तगत करण्यात आले. दुचाकी चोरी प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर लॅपटॉप, मोबाईल चोरी प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. असे दोन्ही गुन्हे युनिट एक पथकाने उघडकीस आणले. संशयीतांना संबंधित पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

SCROLL FOR NEXT