Suspects arrested in case of burning vehicles in Jail Road area. A team from Unit Two of the City Crime Branch along with esakal
नाशिक

Nashik Crime News : वाहनाची जाळपोळ करणार्यांना तासाभरात जेरबंद; युनिट दोनची कामगिरी

Nashik Crime : जेलरोड परिसरातील पिंपळपट्टी येथे बुधवारी (ता. ६) पहाटे अज्ञातांनी दोन दुचाक्यांची जाळपोळ करीत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जेलरोड परिसरातील पिंपळपट्टी येथे बुधवारी (ता. ६) पहाटे अज्ञातांनी दोन दुचाक्यांची जाळपोळ करीत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अवघ्या तासाभरात दोघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. निखिल संजय बोराडे (२४, रा. पिंपळपट्टी रोड, जेलरोड), निलेश भास्कर कांबळे (२३, रा. बालाजीनगर, जेलरोड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. (nashik crime accused Arsonists jailed within an hour marathi news)

जेलरोड परिसरातील भगवती लॉन्स शेजारी असलेल्या दोन दुचाक्या संशयित दोघांनी अज्ञात कारणातून बुधवारी (ता.६) पहाटेच्या सुमारास जाळल्या होत्या. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला असता, अंमलदार विशाल पाटील यास संशयितांची खबर मिळाली. त्यानुसार, पथकाने जेलरोडच्या इंदिरा गांधी पुतळा परिसरात आले होते. तेथून ते पलायन करण्याच्या बेतात असतानाच दबा धरून असलेल्या पथकाने दोघांना जेरबंद केले.

गुन्ह्याच्या अवघ्या तासाभरात दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. सदरची कामगिरी युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.डी. श्रीमनवार, सहायक निरीक्षक सचिन जाधव, बाळू शेळके, प्रकाश भालेराव, विशाल पाटील, मनोहर शिंदे, शंकर काळे, प्रकाश महाजन, नितीन फुलमाळी यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

French PM Resigns: फ्रान्सची राजकीय अस्थिरता शिगेला! मंत्रिमंडळ नेमलं, पण पंतप्रधानांचा काही तासांत राजीनामा

Vijay Wadettiwar: ''काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर...'', जरांगेंना उत्तर देताना वडेट्टीवारांचं मोठं विधान

Pune Traffic Police : मोशीत वाहतूक पोलिसाला मारहाण करणारे दोघे अटकेत; सिग्नल तोडल्याचे छायाचित्र काढल्याने वाद

Shocking News: हृदयद्रावक घटना ! पुराने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला; शेतकऱ्याने दुसऱ्याच दिवशी जीवन संपवले

SCROLL FOR NEXT