police action on Road Romeo esakal
नाशिक

Nashik Police : युवतींचा पाठलाग करणाऱ्या ‘रोडरोमिओं’ना दणका! पोलिसांनी केली प्रतिबंधात्मक कारवाई

Crime News : मोपेडवरून जाणाऱ्या दोघा युवतींचा पाठलाग करीत त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोमरोमिओंना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : मोपेडवरून जाणाऱ्या दोघा युवतींचा पाठलाग करीत त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोमरोमिओंना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. युवतींनी या रोडरोमिओंची माहिती पोलीस आयुक्तांच्या व्हॉटसअॅपवर पाठविताच, सजग असलेल्या पथकाने कारवाई करीत, संशयित रोडरोमिओंविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. (Nashik Crime action to roadromios chasing young women news)

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ‘सुरक्षित नाशिक’ अंतर्गत महिला सुरक्षेला प्राधान्यक्रम देताना पोलिस ठाणे व पथकांनाही सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्यांच्या पथकांसह आणि निर्भया, दामिनी पथके आयुक्तालय हद्दीत गस्तीवर असतात.

दरम्यान, गेल्या आठवड्यात एका युवतीने पोलीस आयुक्तांच्या व्हॉटसॲपवर संदेश पाठविला होता. त्यात तिने, ‘दोघेजण आमचा पाठलाग करीत आहेत’, असा संदेश पाठवितानाच तिने संशयित रोडरोमीओंच्या मोपेड दुचाकीचा फोटोही पाठविला होता. (latest marathi news)

सदरचा संदेश मिळताच आयुक्तांनी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला तात्काळ कारवाईची सूचना केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी प्रादेशिक परिवहन विभागातून युवतीने पाठविलेल्या फोटोतील मोपेड क्रमांकावरुन चालकाची माहिती घेतली आणि पथकाने मोपेडस्वार रोडरोमीओंचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. अगदी तासाभरात कारवाई केल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतूक झाले. ताब्यात घेतलेल्या रोडरोमिओंविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

"महिला सुरक्षित तर शहर सुरक्षित या उक्तीप्रमाणे पोलिस सतर्क आहेत. त्यामुळे कोणीही मुलींची छेडछाडी केली, पाठलाग केला, त्रास दिल्यास तात्काळ शहर पोलीस आयुक्तालयाचा व्हॉटसॲपवर क्रमांक ९९२३३२३३११ यावर वा डायल ११२ या वर संपर्क साधावा. पोलिसांकडून तात्काळ कारवाई केली जाईल."

- मधुकर कड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शहर गुन्हेशाखा युनिट एक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT