Advay Hire Fraud case esakal
नाशिक

Advay Hire Fraud Case : अद्वय हिरे यांना दिलासा नाही; जामीन अर्ज फेटाळला

Crime News : बँकेची फसवणूक व कर्ज थकबाकीच्या आरोपावरुन न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेनेचे (उबाठा) युवानेते अद्वय हिरे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

प्रमोद सावंत

मालेगाव : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून रेणुकादेवी सहकारी सुतगिरणीस घेतलेल्या कर्ज प्रकरणी बँकेची फसवणूक व कर्ज थकबाकीच्या आरोपावरुन न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेनेचे (उबाठा) युवानेते अद्वय हिरे (Advay Hire Fraud Case) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी गुुरुवारी (ता. ७) हा निकाल दिला. (nashik crime Advay Hire Fraud Case marathi news)

जामीन अर्ज फेटाळल्याने श्री. हिरे यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे. जामीनासाठी आता त्यांच्यातर्फे उच्च न्यायालयात अर्ज करण्यात येईल. श्री. हिरे यांच्या जामीन अर्जावर बुधवारी येथील न्यायाधीश बघेले यांच्यासमोर सुनावणी झाली.

सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट महेंद्र फुलपगारे यांनी जामीनास विरोध केला. श्री. हिरे यांच्यातर्फे ॲडव्होकेट अनंतराव जगताप यांनी दोन तास युक्तीवाद केला. यात प्रामुख्याने या गुन्ह्यासाठी लावलेले कलम या गुन्ह्यात लागू शकत नाहीत. आरोपपत्र दाखल झाले आहे. गुन्ह्याचा तपास पुर्ण झाल्याने जामीन मिळावा असा दावा केला होता.

याउलट जिल्हा बँकेतर्फे ॲडव्होकेट ए. आय. वासीफ यांनी हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. संघटीतरित्या केलेला आहे. दोषारोप पत्र दाखल झाले असले तरी जामीन मंजूर केल्यास चुकीचा संदेश जाईल. जामीन अर्ज मंजूर करु नये असा युक्तीवाद केला. जिल्हा बँकेचे वकील वासिफ व सरकार पक्षाचे वकील फुलपगारे यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधीश बघेले यांनी श्री. हिरे यांचा जामीन फेटाळला. (Latest Marathi News)

ॲडव्होकेट वासिफ म्हणाले, की सन २०१३ मध्ये रेणुकादेवी सहकारी सुतगिरणीसाठी जिल्हा बँकेतर्फे कर्ज घेतले. त्यावेळी अद्वय हिरे हे बँकेचे अध्यक्ष होते. पहिल्या टप्प्यातील २ कोटी ८० लाख रुपये कर्ज घेण्यासाठी तारण दिलेली मालमत्ता अवघी १ कोटी ५१ लाखाची होती.

या तारण मालमत्तेवर तीन टप्प्यात एकूण ७ कोटी ४६ लाख रुपये कर्ज देण्यात आले आहे. थकबाकी व्याजासह रक्कम थकीत आहे. याउलट बँकेतील सामान्य ग्राहकांना त्यांचे गुंतवणूक केलेले पैसे मिळणे अवघड झाले आहे. कर्जापोटी घेतलेली रक्कमेतील ६ कोटी रुपये श्री. हिरे यांनी रेणुकादेवी सुतगिरणीच्या खात्यातून व्यंकटेश बँकेत वर्ग केले. या बँकेचे अध्यक्ष त्यांचे वडील होते. शिवाय यंत्रमाग युनिट सुरु झाले नाही. यामुळे जामीन अर्ज मंजूर करु नये असा युक्तिवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

SCROLL FOR NEXT